बँक आॅफ इंडियाच्या सोलापूरसह सहा जिल्ह्यातील २२ हजार शेतकºयांची १५९ कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:39 AM2018-06-18T11:39:59+5:302018-06-18T11:39:59+5:30

छ. शिवाजी महाराज सन्मान योजना : सात जिल्ह्यातील ८४ शाखांचे कर्जदार

Loan forgiveness of 159 crores of 22 thousand farmers of 6 districts including Solapur of Bank of India | बँक आॅफ इंडियाच्या सोलापूरसह सहा जिल्ह्यातील २२ हजार शेतकºयांची १५९ कोटींची कर्जमाफी

बँक आॅफ इंडियाच्या सोलापूरसह सहा जिल्ह्यातील २२ हजार शेतकºयांची १५९ कोटींची कर्जमाफी

Next
ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील ११,६८८ शेतकºयांचा समावेशराज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या याद्या येणे सुरुचआतापर्यंत ९ ग्रीन लिस्ट

अरुण बारसकर
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून बँक आॅफ इंडियाच्या माध्यमातून २२ हजार ४२८ शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीतून १५९ कोटी ४ लाख १ हजार ६१७ रुपये जमा झाले असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक प्रदीप कांबळे यांनी दिली. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११,६८८ शेतकºयांचा समावेश आहे.

सोलापूर विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सात जिल्ह्यांचा समावेश असून यामध्ये सोलापूर, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. या सात जिल्ह्यात एकूण ८४ शाखा असून एकट्या सोलापूर जिल्ह्यात ५३ शाखा आहेत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या याद्या येणे सुरुच असून आतापर्यंत ९ ग्रीन लिस्ट आल्या आहेत. मागील आठवड्यात बँक आॅफ इंडियाच्या सोलापूर विभागातील ३ हजार ४९८ शेतकºयांची ‘ग्रीन’ लिस्ट आली असून याची रक्कम २७ कोटी ९५ हजार ७४२ रुपये मिळाली आहे. कर्जमाफीची बँक आॅफ इंडियाच्या खातेदारांना मिळालेल्या रकमेत सोलापूर जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांची संख्या मोठी आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार ६८८ शेतकºयांना ७८ कोटी ८३ लाख ६७ हजार ३८० रुपयांचा फायदा झाला आहे. 

-----------------

नियमित कर्ज भरणाºयांना ८ कोटी 

  • - एकूण ९ लिस्टमध्ये थकबाकीदार (दीड लाखापर्यंत)  १६ हजार ९३९ शेतकºयांसाठी १३१ कोटी ६४ लाख ३२ हजार २६ रुपये बँकेला आले असून ही रक्कम बँकेलाच मिळाली आहे.
  • - नियमित कर्ज भरणाºया ३६३७ शेतकºयांना प्रोत्साहनचे ७ कोटी ८४ लाख ६५ हजार ९३१ रुपये मिळाले असून ही रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.
  • - एकरकमी परतफेड योजना(ओ.टी.एस.) योजनेत दीड लाखावरील रक्कम भरणाºया १८५२ शेतकºयांना १९ कोटी ५५ लाख ३ हजार ६५९ रुपये मिळाले आहेत. 

----------
कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी व रक्कम
- बीड जिल्हा- १२७८ शेतकरी, ७ कोटी ५ लाख ९९ हजार ८७० रुपये.
- हिंगोली जिल्हा- १८५८ शेतकरी, ११ कोटी ६९ लाख १९ हजार ४३५ रुपये.
- लातूर जिल्हा- ७८५ शेतकरी, ७ कोटी ८ लाख ४३ हजार २१४ रुपये.
- नांदेड जिल्हा- ४८६३ शेतकरी, ३७ कोटी ३१ लाख १४ हजार ९०६ रुपये.
- उस्मानाबाद जिल्हा- १५३६ शेतकरी, १४ कोटी ४० लाख ३० हजार २६८ रुपये.
- परभणी जिल्हा- ४२० शेतकरी, दोन कोटी ६५ लाख २६ हजार ५४४ रुपये. 
- सोलापूर जिल्हा- ११ हजार ६८८ शेतकरी, ७८ कोटी ८३ लाख ६७ हजार ३८० रुपये. 


अधिकाधिक शेतकºयांना कर्ज देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. दीड लाखावरील रक्कम भरुन शेतकºयांनी तत्काळ कर्जमुक्त व्हावे. गरजेनुसार नव्याने कर्ज दिले जाईल.
- प्रदीप कांबळे
विभागीय व्यवस्थापक

Web Title: Loan forgiveness of 159 crores of 22 thousand farmers of 6 districts including Solapur of Bank of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.