करमाळयाजवळ पुलावरून जीप कालव्यात कोसळली, तिघे जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:25 PM2018-06-20T12:25:20+5:302018-06-20T12:25:20+5:30

टेभूर्णी-अहमदनगर राज्य मार्गावर करमाळा तालुक्यातील कुंभेज फाट्याजवळ घडली आहे.

At Karamalaya, a jeep collapsed from the bridge and killed three on the spot | करमाळयाजवळ पुलावरून जीप कालव्यात कोसळली, तिघे जागीच ठार

करमाळयाजवळ पुलावरून जीप कालव्यात कोसळली, तिघे जागीच ठार

Next
ठळक मुद्दे टेभूर्णी ते जातेगाव रस्त्याच्या चौपदरी चे काम रखडलेबोलेरो पुलाचा कठडा तोडून कालव्यात पडलीयाच मार्गावर गेल्या तीन वर्षात १५४ जण अपघातात बळी गेले

सोलापूर / करमाळा :  गोवा येथे  फिरण्यासाठी निघालेली बोलेरो जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावरून कालव्यात पडल्याने जीप मधील तिघे जण जागीच ठार झाल्याची दुर्घटना टेभूर्णी-अहमदनगर राज्य मार्गावर करमाळा तालुक्यातील कुंभेज फाट्याजवळ घडली आहे. अपघातात ठार झालेले तिघे ही जामनेर जि.जळगाव येथील आहेत.

 शेख फारूक शेख रमजान (वय ५७), तयरीम शेख जफर (वय २०), फरहान शेख एहसान (वय २२) हे अपघातात मरण पावलेले तिघे आहेत.  रमजान ईद चा सण झाल्यानंतर सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी जामनेर जि.जळगाव येथून गोवा येथे  शेख कुटुंबिय दोन वाहनातून मंगळवारी राञी ९ वा.निघाले होते.

रस्त्यात औरंगाबाद येथे राञी १२ वाजण्याच्या सुमारास जेवन केल्यानंतर अहमदनगरमार्गे निघाले असता पहाटे चारच्या सुमारास करमाळा तालुक्यातील कुंभेज फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाचा कठडा तोडून बोलेरो जीप क्र.एम.एच.१९/ ९८५६ कालव्यात पडली व त्या मधील तिघे जागीच ठार झाले. दुस-या वाहनातून निघालेल्यांना अपघाताची माहीती मिळाली नाही ते पुढे पंढरपूर पर्यंत समकाळी ६.३० वा.पर्यंत पोहचले होते. अपघाताची खबर पोलिसांना सकाळी मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले.मयत शेख फारूक यांच्या खिशातील मोबाइल घेऊन त्यांनी केलेल्या काँल वर फोन केल्यानंतर अपघाताची माहीती पुढे गेलेल्या नातेवाईकांना समजली.
-------------
अरूंद रस्त्याचे बळी..
टेभूर्णी-अहमदनगर राज्य मार्गावरील टेभूर्णी ते जातेगाव रस्त्याच्या चौपदरी चे काम रखडले असून अरूंद रस्ता व पुलाचा अंदाज न आल्याने बोलेरो पुलाचा कठडा तोडून कालव्यात पडली व तिघे ठार झाले. याच मार्गावर गेल्या तीन वर्षात १५४ जण अपघातात बळी गेले आहेत.
फोटो

Web Title: At Karamalaya, a jeep collapsed from the bridge and killed three on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.