पहिल्या पेशव्यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बाजीराव विहिरीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 05:06 PM2018-07-15T17:06:14+5:302018-07-15T17:08:48+5:30

प्रशासनाचे दुर्लक्ष : विहिरीवर संरक्षक जाळी बसविण्याची भाविकांची मागणी

The historic Bajirao wells built by the first Peshwa | पहिल्या पेशव्यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बाजीराव विहिरीची दुरवस्था

पहिल्या पेशव्यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बाजीराव विहिरीची दुरवस्था

googlenewsNext
ठळक मुद्देपुरातत्त्व विभागाच्या अभ्यासकांनीही या विहिरीला भेट देऊन पाहणी केली ऐतिहासिक बाजीराव विहिरीच्या कठड्याचे कोरीव दगड गायब प्रशासनाने विहीर व परिसराची स्वच्छता करणे गरजेचे

प्रभू पुजारी/रामदास नागटिळक । 

पंढरपूर : ऐतिहासिक बाजीराव विहीऱ़़ या विहिरीचे कोरीव व रेखीव दगड चक्क चोरीला गेलेले़़़ विहिरीत अन् पायºयांवर कचरा साचलेला़़़ प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, पालापाचोळा पडलेला़़़ केवळ शासनाच्या दुर्लक्षामुळे या बाजीराव विहिरीची दुरवस्था झाल्याचे दिसून येते़ 

पंढरपूरपासून पुणे मार्गावर केवळ १० किलोमीटर अंतरावर ही ऐतिहासिक बाजीराव विहीर आहे़ पहिले बाजीराव पेशवे यांच्या स्मरणार्थ अहिल्यादेवी होळकर यांनी ही विहीर बांधली आहे. या ठिकाणी श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली व श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील अखेरचे उभे व गोल रिंगण या ठिकाणी होत असल्याने या स्थळाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. 

या रिंगण सोहळ्यादरम्यान लाखोंच्या संख्येने वारकरी या बाजीराव विहीर परिसरात विश्रांती घेतात़ शिवाय पंढरीकडे जाणारा पालखी सोहळ्यातील प्रत्येक भाविक ही ऐतिहासिक विहीर नक्की पाहतोच़ 
याशिवाय महाराष्ट्रातील अनेक इतिहासतज्ज्ञ व पुरातत्त्व विभागाच्या अभ्यासकांनीही या विहिरीला भेट देऊन पाहणी केली आहे़ पंढरपूर-पुणे मार्गावर ही विहीर असल्यामुळे अनेक पर्यटक या मार्गावरून जाताना वाहने थांबवून ही ऐतिहासिक बाजीराव विहीर नक्कीच पाहतात़ परंतु अशा या ऐतिहासिक बाजीराव विहिरीच्या कठड्याचे कोरीव दगड गायब झाले आहेत़ शिवाय या विहिरीच्या पायºयांवर आणि पाण्यात प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, पालापाचोळा पडल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे़ त्यामुळे प्रशासनाने विहीर व परिसराची स्वच्छता करणे गरजेचे आहे़

प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्यातील मुक्कामाच्या व विसावा ठिकाणी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो़ परंतु पालखीमार्गावरील या ऐतिहासिक विहिरीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते़ त्यामुळे प्रशासनाने चोरीला गेलेल्या दगडांच्या ठिकाणी दुसरे दगड बसवून पूर्वीप्रमाणे कठडा तयार करावा आणि विहिरीवर संरक्षक जाळी बसवावी, अशी मागणी आषाढी सोहळ्यासाठी पंढरीकडे येणाºया अरुण पठारे, सुनील पांढरे, अरविंद राजगुरू आदी भाविकांनी केली आहे़ 

ऐतिहासिक बाजीराव विहिरीचा स्वतंत्र १३४ असा गट नंबर ७/१२ चा उतारा आहे. मात्र या उताºयावर एका शेतकºयाचे नाव होते़ या नावाचा गैरफायदा घेत काही अज्ञात व्यक्तींनी खोटी कागदपत्रे बनवित ही जागा विकण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भंडीशेगाव ग्रामपंचायतीने ठराव करीत ही जागा शासनाच्या नावे करण्याची मागणी केली़ त्यानंतर त्यात बदल करून महसूल प्रशासनाने या विहिरीच्या ७/१२ उताºयावर ‘महाराष्ट्र शासन’ अशी नोंद केली आहे. त्यामुळे शासनानेच या विहिरीची देखभाल, दुरुस्ती करणे गरजेचे आहे़

भाविकांच्या जीवाला धोका
- २२ जुलै रोजी याच बाजीराव विहिरीच्या परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे व गोल रिंगण होणार आहे़ या पालखी सोहळ्याबरोबर असलेले लाखो वारकरी या विहीर परिसरात विश्रांत घेतात़ शिवाय ही विहीर पाहण्याचा मोह अनेक भाविकांना आवरत नाही़ या विहिरीवर संरक्षक जाळी नसल्याने तोल जाऊन भाविकांच्या जीवाला धोका होण्याची दाट शक्यता आहे़ 

या विहिरीजवळ ऐतिहासिक बाजीराव विहिरीची संपूर्ण माहिती लिहून फलक लावावा़ विहीर परिसरात वृक्षारोपण करून कायमस्वरूपी सौरदिव्याची सोय करावी़ चोरून नेलेल्या दगडांच्या ठिकाणी पुन्हा कोरीव दगड बसवून संपूर्ण विहिरीवर संरक्षक जाळी लावावी़
- बापूसाहेब पठारे,
वारकरी, माजी आ़ वडगाव (पुणे) 

Web Title: The historic Bajirao wells built by the first Peshwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.