सोलापूर शहराच्या मानवी वसाहतीतच गॅस‘बॉम्ब’; सोलापूरकरांच्या जीविताला धोक्याची घंटा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 02:19 PM2019-02-25T14:19:29+5:302019-02-25T14:22:00+5:30

रेवणसिद्ध जवळेकर सोलापूर : गॅस अन् रॉकेलचा कधी, केव्हा भडका उडेल याचा काही नेम नाही. शहरात याआधी अशा दुर्घटना ...

Gas bomb in human habitation of Solapur city; Solapur's life threatens danger! | सोलापूर शहराच्या मानवी वसाहतीतच गॅस‘बॉम्ब’; सोलापूरकरांच्या जीविताला धोक्याची घंटा !

सोलापूर शहराच्या मानवी वसाहतीतच गॅस‘बॉम्ब’; सोलापूरकरांच्या जीविताला धोक्याची घंटा !

googlenewsNext
ठळक मुद्दे‘लोकमत’ चमूने आॅन दी स्पॉट रिपोर्टिंग करताना मिनी गॅसपंपचा गोरखधंदा उघडल्याचे निदर्शनास आलेदिवसभर ते रात्री उशिरापर्यंत हा गोरखधंदा चालत असल्याच्या प्रकाराला रहिवाशांनीही दुजोरा दिला

रेवणसिद्ध जवळेकर

सोलापूर : गॅस अन् रॉकेलचा कधी, केव्हा भडका उडेल याचा काही नेम नाही. शहरात याआधी अशा दुर्घटना घडलेल्या असतानाही शहरातील मानवी वसाहतीतच ‘गॅस बॉम्ब’ अर्थातच मिनी गॅसपंप खुलेआम चालत असल्याचे ज्या-त्या भागातील जागरुक रहिवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना पोलीस अन् पुरवठा विभाग मूग गिळून गप्प बसतोय, असा आरोपही केला. आमच्या जीविताला हे गॅस बॉम्ब जणू धोक्याचीच घंटी असल्याची भीतीही व्यक्त करताना त्यांच्या चेहºयावर तसा भावही दिसत होता. 

रविवारी दुपारी ‘लोकमत’ चमूने आॅन दी स्पॉट रिपोर्टिंग करताना मिनी गॅसपंपचा गोरखधंदा उघडल्याचे निदर्शनास आले. दिवसभर ते रात्री उशिरापर्यंत हा गोरखधंदा चालत असल्याच्या प्रकाराला रहिवाशांनीही दुजोरा दिला. ‘लोकमत’ चमू रविवारी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी राजेंद्र चौकात पोहोचला. तेथील बसवेश्वर हॉस्पिटलच्या उत्तर दिशेकडून जाणारा एक रस्ता आहे. या रस्त्यावरच अगदी छोट्याशा टपरीत एक गॅसटाकी उलटी ठेवण्यात आली होती. जवळच एका रांगेत सहा घरगुती गॅस सिलेंडर ठेवण्यात आले होते. त्यापैकी एक टाकीही उलटी करुन ठेवण्यात आली होती. या टाक्यांजवळ पाण्याचा एक जारही ठेवण्यात आला होता. १२ वाजून १७ मिनिटांनी हे चित्र चमूने कॅमेºयात बंदिस्त केले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत एकापाठोपाठ एक अशा तीन-चार रिक्षा तेथे दाखल झाल्या.

हॉस्पिटलच्या याच दिशेला बसवेश्वर मेडिकल शॉप आहे. तेथून हाकेच्या अंतरावर संजीवनी नर्सिंग होम आणि लगतच कोचिंग क्लासेस आहे. रिक्षांमध्ये घरगुती गॅस भरण्यासाठी आलेल्या चालकांमुळे बसवेश्वर हॉस्पिटलकडील रस्ताच ठप्प झाला. मेडिकल दुकानात औषधे, गोळ्या घेण्यासाठी आलेल्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्रही आॅन दी स्पॉट रिपोर्टिंग करताना प्रखरपणे जाणवले. त्या भागातील काही रहिवाशांना बोलते केले असता त्यांनी ‘साहेब, हे रोजचेच आहे.

रिक्षात गॅस भरताना एखादा स्फोट होण्याची वाट पोलीस पाहणार आहे का ?’ असा सवालही त्यांनी ‘लोकमत’ चमूसमोर केला. परिसरातील अनेकांना बोलते केले असता त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर अशाच प्रतिक्रिया दिल्या. राजेंद्र चौक हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. परिसरात अनेक शाळा आहेत. इथल्या मिनी गॅसपंपसमोरच महापालिकेच्या परिवहन विभागाचा डेपोही आहे. चारचाकी वाहनांमध्ये गॅस भरताना जवळ कोणी सिगारेट, विडी ओढत असेल तर काय अनर्थ घडेल, याचा विचार पोलीस खात्याने करावा, असा सूर जागरुक नागरिकांमधून ऐकावयास मिळाला. जेलरोड पोलीस याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणीही होत आहे.

मजरेवाडी शाळेजवळही गॅस बॉम्ब !
- होटगी रोडवर मजरेवाडी जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेसमोरुन नई जिंदगीकडे जाणाºया रस्त्यावर हिरव्या कापडांनी झाकोळलेली टपरी पाहावयास मिळाली. दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी तेथे रिक्षात गॅस भरतानाचे चित्र दिसत होते. ती रिक्षा गेली अन् मारुती व्हॅन गॅस भरण्यासाठी दाखल झाली. या भागातील लोकांशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी या रस्त्याने येत असताना त्यांना हा प्रकार दिसत नाही का ? असा सवाल त्यांच्या प्रतिक्रियांमधून दिसून आला. 

प्रतिकिलो ७५ रुपये दराने गॅस भरताहेत !
- सोलापूर शहर आणि परिसरात काही गॅसपंप आहेत. शासनाच्या मान्यतेने उभारलेल्या या गॅसपंपांमधूनच गॅस भरणे गरजेचे असताना रिक्षांसह अन्य चारचाकी वाहनचालक बेकायदेशीर गॅस भरुन घेण्याकडे का वळत आहेत, हा प्रश्न काही रिक्षाचालकांसमोर उपस्थित केला. दोघा-तिघा रिक्षाचालकांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘साहेब, त्या गॅसपंपावर अ‍ॅव्हरेज मिळत नाही. शिवाय किलोमागचे दरही अधिक आहेत. इथे घरगुती गॅस भरुन मिळत असल्याने दरही कमी आहेत’.

घरगुती गॅस वाहनांमध्ये भरणे, याकडे पोलीस गांभीर्याने पाहतात. असे प्रकार कुठे होत असतील तर त्याचा शोध घेऊ आणि तेथील गॅस भरण्याच्या साहित्यासह संबंधितांवर कारवाई करू. गंभीर स्वरुपाचा हा गुन्हा असल्याने त्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक करीत असतात. आमचे बीट मार्शल व अन्य पथके फिरत असतात. मजरेवाडी येथील पॉइंटवर छापा घालून कारवाई करण्यात येईल.
-रमेश चिंताकिंदी,
सहायक पोलीस निरीक्षक (एमआयडीसी ठाण्याचा तात्पुरता पदभार)

जेलरोड हद्दीत घरगुती गॅस वाहनांमध्ये भरत असल्याचे पॉइंट शोधून काढू. त्यांच्यावर ठोस कारवाई होईलच. डी. बी. पथक आणि अन्य पथकांच्या माध्यमातून मिनी गॅसपंप उजेडात आणण्याचा कसोशीने प्रयत्न करू.
-सुनील जाधव,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक- जेलरोड पोलीस ठाणे. 

Web Title: Gas bomb in human habitation of Solapur city; Solapur's life threatens danger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.