कावडीच्या आगमनाने कण्हेरला आले चैत्री यात्रेचे स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 10:59 AM2018-12-31T10:59:08+5:302018-12-31T11:00:48+5:30

माळशिरस : रंगीबेरंगी कापडांनी सजवलेल्या कावडी... हलगी व घुमक्याचा ठेका... शंभो शिव हर हर महादेवच्या गर्जना़.. तेली भुतोजी महाराजांच्या ...

The form of Chaitri Yatra came to Kanher from Kavadi's arrival | कावडीच्या आगमनाने कण्हेरला आले चैत्री यात्रेचे स्वरुप

कावडीच्या आगमनाने कण्हेरला आले चैत्री यात्रेचे स्वरुप

Next
ठळक मुद्देप्राचीन कण्हेसिद्ध मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून शिखर व परिसराच्या विकासाचे काम सुरू मूतीर्ची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात येणार

माळशिरस : रंगीबेरंगी कापडांनी सजवलेल्या कावडी... हलगी व घुमक्याचा ठेका... शंभो शिव हर हर महादेवच्या गर्जना़.. तेली भुतोजी महाराजांच्या कावडी... कावडी खांद्यावर घेऊन नाचवणारे भाविक... हे चित्र पाहिले की चैत्र महिन्यात भरणारी शिखर शिंगणारपूरातील चैत्री यात्रेची आठवण येते़  मात्र कावडीच्या आगमनाने कण्हेर (ता. माळशिरस ) गावात भक्तीमय वातावरण तयार झाले असून चैत्री यात्रेची स्वरुप आले आहे़ येथील कण्हेरसिद्ध मंदिराच्या कलशरोहण  सोहळ्यासाठी भाविकांचा महामेळा भरला आहे़ पंचक्रोशीतून हजारो भाविक या सोहळयासाठी आल्याने गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

प्राचीन कण्हेसिद्ध मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिखर व परिसराच्या विकासाचे काम सुरू होते़ ते आता पूर्ण झाले आह़े़ त्यानंतर आता कलशरोहण कार्यक्रम व इतर  काही देवदेवतांची मूर्ती, नंदीची मूर्ती अशा काही मूतीर्ची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे़ मिरवणुकीदरम्यान पंचक्रोशीतील गावांमधून आलेल्या गजी ढोल पथकांनी गजी नृत्य सादर केले. त्यानंतर तेली भुतोजी महाराजांच्या कावडीसह कण्हेर पंचक्रोशीतीत अनेक कावडी रंगीबेरंगी पोशाख परिधान करून वाद्याच्या गजरात गावातून प्रदक्षिणा करू लागल्या होत्या.

यात युवकांनी विविध वाद्याच्या तालावर कावडी नाचवल्या. हर हर महादेवच्या गजरात हजारो भाविक सहभागी झाले आहेत़ यावेळी महिलांनी कावडींचे पूजन केले. या सोहळयासाठी गावातील लहान थोर मंडळी तसेच परगावी असणाºया सर्व गावकरी व नातेवाईकांना आमंत्रण देण्यात आले होते़ ते ही आता गावात आले आहेत़ शिवाय बाहेर गावातून येणाºया भाविकांसाठी महाप्रसादाची व्यावस्था करण्यात आली आहे. श्री श्री नारायण महाराज यांच्या सानिध्यानेकण्हेर नगरीत भाविकांचा महापूर आला आहे.

Web Title: The form of Chaitri Yatra came to Kanher from Kavadi's arrival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.