वादळी वाºयामुळे वाणीचिंचाळेतील तब्बल सत्तर घरांचे उडाले पत्रे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:02 PM2019-06-11T13:02:14+5:302019-06-11T13:05:45+5:30

१२ शेतकºयांचे द्राक्षे, डाळिंबाचे नुकसान : यलमार मंगेवाडीत शेळ्याचे शेड उडाले, छावण्यातील  शेडनेटही जमीनदोस्त

Due to the windstorm, more than 70 domestic flights of Vani Chinchale | वादळी वाºयामुळे वाणीचिंचाळेतील तब्बल सत्तर घरांचे उडाले पत्रे 

वादळी वाºयामुळे वाणीचिंचाळेतील तब्बल सत्तर घरांचे उडाले पत्रे 

googlenewsNext
ठळक मुद्देदुष्काळाने होरपळणाºया सांगोला तालुक्यावरील दुष्टचक्र काही केल्याने संपता संपेना वादळी वाºयामुळे १० गावातील शेकडो घरांवरील पत्रे उडून गेले एकट्या वाणीचिंचाळे गावातील ७० घरांवरील पत्रे उडून गेल्याने कुटुंबं बेघर झाले

सांगोला : दुष्काळाने होरपळणाºया सांगोला तालुक्यावरील दुष्टचक्र काही केल्याने संपता संपेना. रविवारी रात्री १० च्या सुमारास वादळी वाºयामुळे १० गावातील शेकडो घरांवरील पत्रे उडून गेले असून, एकट्या वाणीचिंचाळे गावातील ७० घरांवरील पत्रे उडून गेल्याने कुटुंबं बेघर झाले आहेत. याच गावातील १२ शेतकºयांचे द्राक्षे व डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे़ य.मंगेवाडी येथे शेळ्याचे शेड उडून गेले. सुदैवाने या घटनेत कोठेही जीवितहानी झाली नाही; मात्र वादळी वारे व पावसामुळे छावण्यातील जनावरांच्या निवाºयासाठी उभारलेले शेडनेट उडून गेल्याने जनावरे व पशुपालकांचे हाल झाले. 

रविवारी तालुक्यात मान्सून पावसाचे जोरदार आगमन झाले असून ९ मंडलनिहाय सरासरी ११़२२ मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार संजय पाटील यांनी दिली़ गेल्या पाच ते सहा महिन्यापासून भीषण दुष्काळी परिस्थिती व प्रचंड तापमानामुळे शहर व तालुक्यातील नागरिक हैराण झाले होते़ कधी एकदा मान्सूनचा पाऊस पडतोय आणि उन्हाळ्यातून सुटका होते यासाठी सर्वांचे डोळे पावसाकडे लागून राहिले होते.

गेल्या दोन, चार दिवसांपासून वातावरणात बदल होत असून वादळी वारे व मेघगर्जनेसह तुरळक पावसाच्या सरी कोसळत आहेत. रविवारी दुपारी ४ नंतर आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होऊ लागले होते. रात्री १० च्या सुमारास अचानक जोरदार वादळी वारे वाहू लागताच मेघगर्जनेसह मान्सून पावसाचे आगमन झाले. तासभर वादळी वाºयातच मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र रस्त्यावरुन पाणी वाहू लागले. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.

दरम्यान, वादळी वाºयात मेडशिंगी येथील ६ घरांचे, बुरलेवाडी २ घरावरील, आलेगाव येथील ४ घरांचे, सांगोल्यातील १३ घरांवरील, सोनलवाडी येथील २ घरांचे, वाणीचिंचाळे येथील तब्बल १७ घरांवरील, घेरडी-लोटेवाडी-अजनाळे-लिगाडेवाडी या गावातील प्रत्येकी ५ घरांवरील पत्रे उडून गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहेत.  य.मंगेवाडी येथे शेळ्याचे शेड व वाणीचिंचाळे येथील १२ खातेदार शेतकºयांचे द्राक्षे व डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे.  आलेल्या पावसाने शेतकºयांमधून व्यक्त होत असताना नुकसानीने ते हतबल झाले ओहत.

भंडारकवठे परिसरात  पाणीच पाणी
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे, माळकवठे, निंबर्गी परिसरात रविवारी रात्री पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सुमारे दोन तास पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले.

रविवारी दिवसभर उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. सायंकाळनंतर आभाळ भरून आले आणि रात्री नऊ वाजता पावसाला प्रारंभ झाला. सुमारे दोन तास कमी-अधिक प्रमाणात हा पाऊस कोसळत होता. या पावसाने रानात पाणीच पाणी झाले. खड्डे पाण्याने भरून गेले. काही भागात पावसामुळे पाणी असल्याचे दिसून आले. 

पंचनामा करण्याचे तहसीलदारांचे आदेश
- तहसीलदार संजय पाटील यांनी तलाठ्यांना संबंधित गावात जाऊन पत्रे उडून गेलेल्या घरांचे व नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे करुन अहवाल कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तलाठ्यांनी सोमवारी दिवसभर पंचनामे सुरु होते.
- सांगोल्यात रविवारी रात्री मंडलनिहाय पावसाची आकडेवारी : सांगोला १५, हातीद ३, नाझरा १, महूद १८, संगेवाडी १७, सोनंद ११, जवळा २, कोळा ७, शिवणे २७ असा एकूण १०१ मि. मी़ पाऊस झाला आहे.

Web Title: Due to the windstorm, more than 70 domestic flights of Vani Chinchale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.