'सोलापूरची लेक म्हणून तुमचं स्वागत...', प्रणिती शिंदेंचा राम सातपुतेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 11:32 AM2024-03-25T11:32:59+5:302024-03-25T11:37:35+5:30

Praniti Shinde Ram Satpute : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या राम शिंदे यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे अशी लढत होणार आहे. प्रणिती शिंदे यांनी राम शिंदेंना पत्र लिहून उपरोधिक टोला लगावला आहे.

Congress' Praniti Shinde criticized bjp Ram Satpute by writing a letter on social media | 'सोलापूरची लेक म्हणून तुमचं स्वागत...', प्रणिती शिंदेंचा राम सातपुतेंना टोला

'सोलापूरची लेक म्हणून तुमचं स्वागत...', प्रणिती शिंदेंचा राम सातपुतेंना टोला

Praniti Shinde Ram Satpute ( Marathi News ) : सोलापूर- सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी भाजपने काल राम सातपुते यांच्या उमेदवारीची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्याप्रणिती शिंदे यांच्याविरोधात राम सातपुते अशी लढत होणार आहे. दरम्यान, आज प्रणिती शिंदे यांनी एक पत्र लिहित भाजपच्या राम सातपुते यांना उपरोधिक टोला लगावला आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.  

'शिवतारेंची अजित पवारांवर जहरी टीका', राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडणार? 'या' नेत्याने दिला इशारा

काल भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील तीन उमेदावारांची नावे आहेत. या यादीत सोलापूर मतदारसंघासाठी आमदार राम सातपुते यांना संधी देण्यात आली आहे. राम सातपुते यांच्या समर्थकांनी काल जल्लोष केला, तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियार पोस्ट करत टीका केल्या जात आहे. यात बीडचे पार्सल बीडला परत पाठवूया असं म्हटलं आहे. 

आज सकाळी आमदार प्रणिती शिंदे यांनी एक पत्र ट्विट करत भाजपच्या राम सातपुते यांना टोला लगावला आहे. 

प्रणिती शिंदेंचं पत्र काय?

मा. राम सातपुते जी,

'आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते, असा टोलाही प्रणिती शिंदेंनी पत्रात लगावला आहे. 

'तसंच ह्या उमेद्वारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळालीये त्या बद्दल शुभेच्छा देते.
लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावं असं माझं मत आहे, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

'पुढील ४० दिवस याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करु शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते. सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापूरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते, असंही प्रणिती शिंदेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: Congress' Praniti Shinde criticized bjp Ram Satpute by writing a letter on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.