आत्महत्येचा प्रयत्न करणाºया पंढरपुरातील पोलीसाविरुध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:07 AM2018-12-03T10:07:53+5:302018-12-03T10:09:02+5:30

अधिकाºयाला धारेवर धरण्याचा होता प्रयत्न ; उपचार सुरु

Complaint against police in Pandharpur, trying to commit suicide | आत्महत्येचा प्रयत्न करणाºया पंढरपुरातील पोलीसाविरुध्द गुन्हा दाखल

आत्महत्येचा प्रयत्न करणाºया पंढरपुरातील पोलीसाविरुध्द गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देया प्रकरणाची वरीष्ठ अधिकाºयांकडून चौकशी केली जाणारअधिकाºयांना धारेवर धरणाºया या पोलीस कर्मचाºयांविरुध्द आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

पंढरपूर : आत्महत्येचा प्रयत्न करून वरीष्ठ अधिकाºयाला धारेवर धरणाºया पोलीस कर्मचारी राहुल जगताप विरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न करणे कलम ३०९ भा. द. वि. अन्वये पंढरपुर ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

पंढरपूर तालुका पोलिसांचा पीएस. पंढरपूर (टी) असा व्हॉट्सअप चा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, पोनि. धनंजय जाधव व इतर अधिकारी व पोलीस कर्मचाºयांचा सहभाग आहे. या ग्रुपवर पोलीस हेड कॉन्सटेबल राहुल शिवाजी जगताप याने वरीष्ट अधिकाºयांच्या त्रासाला कंटाळुन आत्महत्या करणार असल्याची पोस्ट व्हायरल करून बेपत्ता झाले होते.

यावेळी त्या वरीष्ठ अधिकाºयाने असे काही करु नको. तु माझ्याविषयी वरिष्ठांना बोल असे सांगितले होते. तरी ही राहुल जगताप २८ नोव्हेंबर पासून घर व काम सोडून गेला होता. ३० नोव्हेंबरला तो भाळवणी येथे बेशुध्द अवस्थेत सापडला होता. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर राहुलने विषारी औषध प्राशन केल्याचे समजले होते. राहुल जगताप याच्या यापुर्वीही अनेक तक्रारींची नोंद पोलीस प्रशासनात आहे. तसेच त्यांना यापुर्वी दंड देखील झाला आहे. त्याचे वेतनवाढ देखील थांबविण्यात आली होती.

या प्रकरणाची वरीष्ठ अधिकाºयांकडून चौकशी केली जाणार आहे. मात्र अधिकाºयांना धारेवर धरणाºया या पोलीस कर्मचाºयांविरुध्द आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Complaint against police in Pandharpur, trying to commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.