मराठा समाजाचं आरक्षण कोर्टात टिकू दे, चंद्रकांत पाटील यांचं विठुरायाला साकडं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 10:10 AM2018-11-19T10:10:49+5:302018-11-19T10:21:03+5:30

मराठा समाजाला दिलेले आरक्षण कोर्टात टिकू दे आणि दुष्काळी जनतेला एखादा मोठा पाऊस दे ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असं साकडं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (19 नोव्हेंबर) विठुरायाला घातलं आहे.

chandrakant patil perform pooja at vitthal temple on the occasion on kartiki ekadashi pandharpur | मराठा समाजाचं आरक्षण कोर्टात टिकू दे, चंद्रकांत पाटील यांचं विठुरायाला साकडं

मराठा समाजाचं आरक्षण कोर्टात टिकू दे, चंद्रकांत पाटील यांचं विठुरायाला साकडं

googlenewsNext
ठळक मुद्दे मराठा समाजाला दिलेले आरक्षण कोर्टात टिकू दे आणि दुष्काळी जनतेला एखादा मोठा पाऊस दे ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असं साकडं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विठुरायाला घातलं आहे. महसूल मंत्री पाटील यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. कार्तिकी एकादशी निमित्त राज्यभरातून लाखो भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरात दाखल झाले आहेत.

पंढरपूर - 'मराठा समाजाला दिलेले आरक्षण कोर्टात टिकू दे आणि दुष्काळी जनतेला एखादा मोठा पाऊस दे ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल', असं साकडं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (19 नोव्हेंबर) विठुरायाला घातलं आहे. तसेच पंढरपुरात 1 डिसेंबरला मराठा आरक्षण मिळाल्याने आणि मंदिर समिती कर्मचाऱ्यांचा रखडलेला आकृतीबंध मंजूर झाल्याचा असा दोन ठिकाणी जल्लोष होणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. कार्तिकी एकादशी निमित्त राज्यभरातून लाखो भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरात दाखल झाले आहेत.

महसूल मंत्री पाटील यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर सभामंडपात झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी बाळासाहेब हरिभाऊ मेंगाणे आणि आनंदी मेंगाणे (रा. मळगे बुद्रुक, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. तसेच ‘मंदिर समितीची रचना करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप विचार केला आहे. त्यामुळे मंदिर समितीचे कामकाज सुरळीत सुरू आहे. भक्त निवासाची सुरुवात करा. वारीच्या निमित्ताने वारकरी येतात. त्यांच्या निवासाची व्यवस्था होईल असे ही त्यांनी सांगितले.

विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अंजली पाटील, दिपाली भोसले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, शकुंतला नडगिरे, रामचंद्र कदम, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले आदी उपस्थित होते.

Web Title: chandrakant patil perform pooja at vitthal temple on the occasion on kartiki ekadashi pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.