केंद्रीय पथकाचा दुष्काळी दौरा ; अधिकारी नुसते येत्यात अन् जात्यात पदरात कायबी नाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 02:54 PM2018-12-06T14:54:14+5:302018-12-06T14:56:05+5:30

करमाळा : अधिकारी नुसते येत्यात..कसला तरी सर्व्हे करत्यात, अन् निघून जात्यात... आमच्या  पदरात काहीच पडत नाही. मागच्या येळची  कर्जमाफी ...

Central team's drought tour; Officers just do not have any work in the past ... | केंद्रीय पथकाचा दुष्काळी दौरा ; अधिकारी नुसते येत्यात अन् जात्यात पदरात कायबी नाय...

केंद्रीय पथकाचा दुष्काळी दौरा ; अधिकारी नुसते येत्यात अन् जात्यात पदरात कायबी नाय...

Next
ठळक मुद्देकरमाळा तालुक्यात पडलेल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रातील अधिकारीकरमाळा  तालुक्यातील जातेगाव शिवारातून दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीस सुरूवातदुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या  पथकाने कामाणे येथे पाण्याअभावी जळून गेलेल्या लिंबूच्या बागेची पाहणी केली

करमाळा : अधिकारी नुसते येत्यात..कसला तरी सर्व्हे करत्यात, अन् निघून जात्यात... आमच्या  पदरात काहीच पडत नाही. मागच्या येळची  कर्जमाफी सुद्धा मिळाली नाही बघा. बँक व सावकाराच्या कर्जासाठी तोंड लपवावं लागतंय आता ..औषध प्यायची पाळी आलीय बघा.. असे निराशेचे बोल आज करमाळा तालुक्यातील जातेगाव येथे दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर जातेगावचे शेतकरी किसन मारूती वारे यांनी सुनावले.

करमाळा तालुक्यात पडलेल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रातील अधिकारी सुभाषचंद्र मीना, एम.जी.टेंभुर्णे व विजय ठाकरे या तीन जणांच्या पथकाने आज सायंकाळी साडेपाच वाजता अहमदनगर व सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या करमाळा  तालुक्यातील जातेगाव शिवारातून दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीस सुरूवात केली. पथकाने जातेगाव येथील किसन मारूती वारे यांच्या दोन एकरातील जळालेल्या कापसाच्या पिकाची पाहणी केली. त्यानंतर जातेगाव येथेच दत्तात्रय मोरे या शेतकºयांच्या शेतात जाऊन पाहणी केली. दत्तात्रय मोरे याने चार एकरात तुरीचे पीक घेतले होते पावसाअभावी वाढ खुंटल्याने तूर कापून जनावरांना घातली असे या शेतकºयाने पथकातील अधिकाºयांना सांगितले.

दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या  पथकाने कामाणे येथे पाण्याअभावी जळून गेलेल्या लिंबूच्या बागेची पाहणी केली. बिटरगाव-श्री गावात ग्रामस्थ पथकाची वाट पाहत होते पण दुष्काळी पाहणी पथक थेट पोथरेमार्गे करमाळ्याजवळ असलेल्या रोसेवाडी येथे आले. तेथे गावातील ग्रामस्थांबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची समस्या जाणून घेत अंधारातच  पाणीपुरवठा करणाºया विहिरीची पाहणी केली व  दुष्काळी पथक पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. 

पथकांसमवेत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, उपविभागीय कृषी अधिकारी सर्जेराव तळेकर, उपजिल्हाधिकारी शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, प्रांताधिकारी मारूती बोरकर, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर,गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, तालुका कृषी अधिकारी संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, जातेगावचे माजी सरपंच संतोष वारे यांच्यासह पाणीपुरवठा, कृषी, जिल्हा परिषद, पंचायत समिती या  विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

क्षणचित्रे..
- केंद्रातून दुष्काळ पाहणीसाठी आलेले पथक अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून सायंकाळी साडेपाच वाजता करमाळा तालुक्यात जातेगाव येथे दाखल झाले.
- पथकाने कामोणे व बिटरगाव येथील शिवेवरील  पावसाअभावी जळालेल्या लिंबूच्या बागेची पाहणी केली. बिटरगाव-श्री येथे पथकाची ग्र्रामस्थ वाट पाहत होते, मात्र पथक बिटरगाव-श्री गावात गेलेच नाही.
४रोसेवाडी येथे पथकाने अंधारात ग्रामस्थांबरोबर पिण्याच्या पिण्याच्या टंचाईची समस्या जाणून घेतली व पाणीपुरवठा करणाºया विहिरीची पाहणी केली.

Web Title: Central team's drought tour; Officers just do not have any work in the past ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.