बार्शी, अक्कलकोट, दक्षिणला २९ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 03:29 PM2018-06-11T15:29:44+5:302018-06-11T15:29:44+5:30

खरीप पीकविमा : तीन तालुक्यांतील ५५ हजार शेतकºयांना मिळाला फायदा

Barshi, Akkalkot, South, approved Rs. 29 crores | बार्शी, अक्कलकोट, दक्षिणला २९ कोटी मंजूर

बार्शी, अक्कलकोट, दक्षिणला २९ कोटी मंजूर

googlenewsNext
ठळक मुद्देपीक विमा उतरण्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीवर जबाबदारी अक्कलकोटला १५ कोटी ३२ लाख२ लाख २६ हजार शेतकºयांनी खरीप पिकांपोटी विम्याची रक्कम बँकात भरली

अरुण बारसकर
सोलापूर:  मागील वर्षीच्या(२०१७) खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी विम्याची बार्शी, अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५५ हजार २४९ शेतकºयांना २८ कोटी ९६ लाख ४ हजार ५३१ रुपये इतकी रक्कम मिळाली आहे. याहीवर्षी बार्शी तालुक्याला खरीप पीक विम्याची रक्कम चांगली मिळाली असली तरी अक्कलकोटची रक्कम सर्वाधिक आहे. 

राज्य शासनाकडून पीक विमा उतरण्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीवर जबाबदारी सोपविली आहे.  मागील वर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील २ लाख २६ हजार शेतकºयांनी खरीप पिकांपोटी विम्याची रक्कम बँकात भरली होती. त्याची नुकसानभरपाई मंजूर झाली असून बार्शी, अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या तालुक्यांतील शेतकºयांनाच नुकसानभरपाई मिळाली आहे. 

उडीद, मूग, भात,सूर्यफुल, मका, बाजरी व भुईमूग या पिकांचा नुकसान भरपाईमध्ये समावेश असून तोही या तीनच तालुक्यातील शेतकºयांसाठी आहे. कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यातील शेतकºयांनी विम्याची रक्कम भरली असली तरी केवळ तीन तालुक्यांचा विमा कंपनीने नुकसानीमध्ये समावेश केला आहे. ही रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर विमा कंपनीनेच जमा केली आहे.

  • - खरीप हंगामातीलच हवामानावर आधारित फळबागांसाठी विम्याचे ४ हजार ३१६ शेतकºयांना १५ कोटी १९ लाख ८४ हजार ९५ रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा झाले आहेत. यामध्ये सांगोल्याला ७ कोटी ६५ लाख तर मंगळवेढ्याला ५ कोटी ९५ लाख रुपये मिळाले आहेत. 
  •  

मंजूर झालेले......

  • - अक्कलकोटला १५ कोटी ३२ लाख
  • - बार्शी तालुक्यातील २६ हजार ८९९ शेतकºयांना १२ कोटी ५४ लाख १४ हजार २७६ रुपये मंजूर झाले.
  • - अक्कलकोट तालुक्यातील १८ हजार शेतकºयांना १५ कोटी ३२ लाख ६७ हजार ७४१ रुपये मंजूर झाले आहेत.
  • - दक्षिण सोलापूर तालुक्यातील १० हजार ३५० शेतकºयांना १ कोटी ९ लाख २२ हजार ५१४ रुपये मंजूर झाले आहेत. 

Web Title: Barshi, Akkalkot, South, approved Rs. 29 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.