बालाजीला देवदर्शनासाठी गेलेले सांगोल्याचे तिघे अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:50 AM2019-03-12T10:50:17+5:302019-03-12T10:51:59+5:30

सांगोला : बालाजी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची भरधाव स्विफ्ट कार व एस.टी. बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कारमधील ...

Balaji, who went to the scene, went to the scene and killed all three accidents | बालाजीला देवदर्शनासाठी गेलेले सांगोल्याचे तिघे अपघातात ठार

बालाजीला देवदर्शनासाठी गेलेले सांगोल्याचे तिघे अपघातात ठार

Next
ठळक मुद्देदोघे जखमी : कार-एसटी बसची अनंतपूरमजवळ समोरासमोर धडकबालाजी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची भरधाव स्विफ्ट कार व एस.टी. बसची समोरासमोर धडकजेव्हा पोलिसांकडूनच दादासाहेब लांडगे, प्रमोद राऊत व गजानन पाटील ठार झाल्याचे समजले तेव्हा आम्हा मित्रांना धक्काच बसला

सांगोला : बालाजी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची भरधाव स्विफ्ट कार व एस.टी. बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाचपैकी दोघे जागीच ठार तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातातील दोघा जखमींवर बत्तमपल्ली व अनंतपूरम येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात ११ रोजी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी चेन्नई-तिरुपती हायवेवर अनंतपूरमपासून ४० कि.मी. अंतरावर बत्तमपल्ली या ठिकाणी घडला़ दादासाहेब यशवंत लांडगे (वय ४५, रा़ माळवाडी, ता़ सांगोला), प्रमोद सुनील राऊत (वय २३, राक़डलास), गजानन राजाराम पाटील (वय २५, रा़ लोणविरे) अशी अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. मारुती बबन गवळी (वय १९, रा़ कडलास) व राजू मधुकर वेदपाठक (रा़ वाटंबरे) अशी जखमींची नावे आहेत. 

सांगोला येथील दादासाहेब लांडगे, प्रमोद राऊत, गजानन पाटील, मारुती गवळी व राजू वेदपाठक असे पाच मित्र दादासाहेब लांडगे यांच्या मालकीच्या एम. एच. ४५ ए़ डी़ ५०८४ या स्विफ्ट कारमधून रविवारी दुपारी ३ च्या सुमारास सांगोल्यातून तिरुपती बालाजीला देवदर्शनासाठी गेले होते. रात्रभर प्रवास करुन त्यांची कार चेन्नई-तिरुपती हायवेवरुन जात असताना अनंतपूरमपासून ४० कि.मी़ अंतरावर बत्तमपल्ली गावाजवळ आली असता आंध्रप्रदेश परिवहनच्या ए. पी. २६ झेड ०२१८ या बसला समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला.

अपघात इतका भीषण होता की, कार बसच्या डाव्या बाजूला घुसल्यामुळे पुढील संपूर्ण भाग चक्काचूर झाल्याने कारमधील दादासाहेब लांडगे व प्रमोद राऊत हे दोघे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक व्ही. रामप्रसाद, पोलीस कर्मचारी वल्ली, हरिनाथ रेड्डी, आनंद या पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना तत्काळ उपचारासाठी बत्तमपल्ली व अनंतपूरम येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान गजानन राजाराम पाटील यांचा मृत्यू झाला. 

जखमींपैकी मारुती गवळी याच्यावर बत्तमपल्ली येथील आदिती हॉस्पिटलमध्ये तर राजू वेदपाठक यांच्यावर अनंतपूरम येथील सवेरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच जखमी व मृतांचे नातेवाईक घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

शेवटच्या कॉलवरून साधला संपर्क
- अपघात घडण्यापूर्वी सकाळी ६़२३ च्या सुमारास गजानन पाटील यांनी कारमधील मित्रांच्या गु्रपचा सेल्फी आपला मित्र राहुल शिंदे याच्या मोबाईलवर शेअर केला होता. त्यावेळी राहुलचा मोबाईल रेंजमध्ये नव्हता. परंतु तो जेव्हा कामावर सांगोल्यात आला तेव्हा मित्राने शेअर केलेला फोटो पाहिला. दरम्यान रविवारी रात्री १० वाजता गजाननने राहुलला फोन करुन जेवण झाले का? अशी विचारणा केली तेव्हा राहुलने हो, जेवण झाले आहे़ सावकाश जा, असा सल्ला दिला होता.

दरम्यान रात्री १० वाजता केलेला हा लास्ट कॉल पाहूनच बत्तमपल्ली पोलिसांनी राहुलशी संपर्क साधून कार अपघाताची माहिती दिली. मात्र मित्राने ६ वाजून २३ मिनिटांनी कारमधील गु्रप सेल्फी पाठवून दिला होता आणि हे असे कसे घडू शकते? मला आताच त्याने सेल्फी पाठविला होता असे म्हणून त्याने अपघाताविषयी हळहळ व्यक्त करुन अपघाताची माहिती गजाननच्या कुटुंबीयांना दिली.

व्यवसायातील मित्रमंडळी
- अपघातातील पाच मित्रांपैकी दादासाहेब लांडगे हे हार-फुले विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे. प्रमोद राऊत याचा मायाक्का माऊली कॉम्प्लेक्समध्ये टेलरिंग मटेरियल विक्रीचा व्यवसाय आहे. गजानन पाटील हा मायाक्का माऊली कॉम्प्लेक्समधीलच महालक्ष्मी मॉलमध्ये कामगार होता. मारुती गवळी याचे सांगोला स्टेशन रोडवरील जुन्या रेल्वे गेटजवळ सलूनचा व्यवसाय आहे. राजू वेदपाठक यांचे वाटंबरे येथे सराफ दुकान आहे. मृत प्रमोद राऊत याचे वडील सुनील राऊत हे मंगल कार्यालय चालवत असून, केटरिंगचाही व्यवसाय करतात.

तो ‘सेल्फी’ अखेरचा ठरला
- बत्तमपल्ली पोलिसांनी गजानन पाटील याच्या मोबाईलवरील शेवटचा कॉल पाहून मित्र राहुल शिंदे याला महाराष्ट्रातील कारला अपघाताची माहिती देऊन एकजण ठार झाल्याचे कळविले होते. मात्र ठार झालेल्या व्यक्तीचे नाव सांगितले नव्हते. सोमवारी दिवसभर या अपघाताविषयी जसजशी चौकशी होत गेली तसतसा मृताचा आकडा एकवरुन तीनवर पोहोचला आणि अपघातात आपला मित्र गजानन पाटील ठार झाल्याचे समजले.  

जेव्हा पोलिसांकडूनच दादासाहेब लांडगे, प्रमोद राऊत व गजानन पाटील ठार झाल्याचे समजले तेव्हा आम्हा मित्रांना धक्काच बसला कारण प्रमोद राऊत याने कारमधील तिघांचा सेल्फी काढून तो व्हॉट्स अ‍ॅपवर डीपी ठेवला होता. ती वेळ ६़२३ मिनिटांची होती. त्यानंतर ६़५० मिनिटांनी कार व एस. टी. बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातावर आमचा विश्वासच बसत नव्हता कारण तो सेल्फी अपघातापूर्वीचा होता. तोच सेल्फी मित्रपरिवाराचा अखेरचा सेल्फी ठरल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Balaji, who went to the scene, went to the scene and killed all three accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.