पालख्यांच्या आगमनापूर्वी पालखीतळाची पाहणी करा, सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:38 AM2018-07-13T11:38:27+5:302018-07-13T11:40:52+5:30

रामचंद्र शिंदे : आषाढीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

Before the advent of Palkhas, inspect the Palaktala, Order of the Collector of Solapur | पालख्यांच्या आगमनापूर्वी पालखीतळाची पाहणी करा, सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांचे आदेश

पालख्यांच्या आगमनापूर्वी पालखीतळाची पाहणी करा, सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांचे आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देइमर्जन्सी आॅपरेटिंग सेंटर १७ ते २७ जुलैपर्यंत सुरू ठेवावेत पालखी मार्गावरील विविध व्यवस्थांसाठी २१ इमर्जन्सी आॅपरेटिंग सेंटर्सपालखी तळावर असलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना

पंढरपूर : आषाढी वारी सोहळ्यासाठी संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी पालखीतळावरील इमर्जन्सी आॅपरेटिंग सेंटर प्रमुखांनी पालखीतळास भेट देऊन तेथील कामांची आणि वारकरी-भाविकांना देण्यात येणाºया सुविधांची पाहणी करावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर रामचंद्र शिंदे यांनी दिल्या.

पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम भवन येथे सर्व अधिकारी-कर्मचाºयांसाठी नैसर्गिक आपत्ती प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती, यावेळी ते बोलत होते़ या कार्यशाळेस उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, शिवाजी जगताप, शमा पवार-ढोक, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत भारती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, तहसीलदार मधुसूदन बर्गे उपस्थित होते.

रामचंद्र शिंदे म्हणाले, जिल्ह्यात १७ जुलै रोजी संत श्री ज्ञानेश्वर माऊलींची नातेपुते तर १८ रोजी संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे अकलूज येथे आगमन होत आहे. प्रमुख पालखी मार्गावरील विविध व्यवस्थांसाठी २१ इमर्जन्सी आॅपरेटिंग सेंटर्स स्थापन करण्यात आली आहेत. या सेंटरवर नियुक्त केलेल्या अधिकाºयांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पालखीतळाला १७ जुलैपूर्वी भेट देऊन पाहणी करावी. पालखी तळावर असलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना द्याव्यात.

इमर्जन्सी आॅपरेटिंग सेंटरवर नियुक्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहतील, याची जबाबदारी ईओसी प्रमुखांची असेल. इमर्जन्सी आॅपरेटिंग सेंटर १७ ते २७ जुलैपर्यंत सुरू ठेवावेत. वारकºयांच्या समस्या नीट ऐकून घ्याव्यात, त्यांना आवश्यक माहिती द्यावी. कामाचा ताण असला तरीही भाविकांना दुरुत्तरे करू नका़ तसेच औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे का? पिण्याच्या पाण्याचे टँकर येण्या-जाण्यासाठी रस्ता योग्य आहे का? याची पाहणी करावी. यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास त्या सुधारणा संबंधित यंत्रणेकडून करून घ्याव्यात, अशा सूचना शिंदे यांनी संबंधित अधिकारी, कर्मचाºयांना दिल्या.

६५ एकर परिसरात ज्या अधिकारी-कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे, अशा अधिकारी कर्मचाºयांनी दिंड्यांसाठी जागा वाटप करताना मापदंडाचे काटेकोर पालन करावे, असे सचिन ढोले यांनी सांगितले. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पथकाने नैसर्गिक आपत्ती निवारण करण्याची प्रात्यक्षिके दाखविली. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास काय उपाययोजना कराव्यात? आपत्ती टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी? याबाबतच्या सूचना पथकातील अधिकाºयांनी कार्यशाळेतील उपस्थितांना दिल्या. यावेळी तहसीलदार विनोद रणवरे, रमा जोशी, ऋषीकेत शेळके, अमोल माळी, प्रमोद कदम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विशाल बडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माहिती कार्यालयाच्या ‘संवाद वारी’ला सहकार्य करा
- संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ‘संवाद वारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातील चित्ररथ, प्रदर्शन, एलईडी मोबाईल व्हॅन, कलापथक आणि पथनाट्य सादर करणाºया पथकांसाठी योग्य जागा मिळवून देण्यासाठी इमर्जन्सी आॅपरेटिंग सेंटर प्रमुखांनी सहकार्य करावे, अशा सूचना उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या. इमर्जन्सी आॅपरेटिंग सेंटरवर नियुक्त अधिकारी-कर्मचाºयांनी कामात हयगय केल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी, असे ढोले यांनी सांगितले.

Web Title: Before the advent of Palkhas, inspect the Palaktala, Order of the Collector of Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.