मंद्रुपमध्ये अतिरिक्त तहसिल कार्यालय, तत्वत मान्यता : सहकारमंत्र्यांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 04:48 PM2017-10-21T16:48:39+5:302017-10-21T17:04:28+5:30

दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रुप येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिल्याची राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़

Additional tehsil office in Mandrup, recognition of the principle: The Cooperative Minister gave information | मंद्रुपमध्ये अतिरिक्त तहसिल कार्यालय, तत्वत मान्यता : सहकारमंत्र्यांनी दिली माहिती

मंद्रुपमध्ये अतिरिक्त तहसिल कार्यालय, तत्वत मान्यता : सहकारमंत्र्यांनी दिली माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देमंद्रुप तालुकानिर्मितीचे पाऊल़़प्रशासकीय कामांचे विकेंद्रीकरण़़ होणार


आॅनलाइन लोकमत सोलापूर
दक्षिण सोलापूर दि २१ : दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रुप येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिल्याची राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़ यासंबंधी प्रस्ताव लवकरच महसुल विभागाकडे सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मंद्रुप येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली़ वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील जनतेची अतिरिक्त तहसिल कार्यालयाची अनेक वर्षापासून मागणी आहे़ यासंदर्भात एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली़ या भेटीत मुख्यमंत्र्यांनी इस्लामपूर येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करण्यास तत्वत: मान्यता देण्याचे जाहीर केले, याचवेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही मंद्रुप येथे अशा अतिरिक्त तहसिल कार्यालयाची मागणी अनेक वर्षापासून होत असल्याचे निदर्शनास आणून देताच मुख्यमंत्र्यांनी इस्लामपूर आणि मंद्रुप येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करण्यासाठी तत्वत: मान्यता दिल्याचे जाहीर केले़
मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक भूमिकेनंतर मंद्रुपचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्या आहेत़ महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तातडीने प्रस्ताव पाठवून तो मंजूर करून घेऊ अशी माहिती देशमुख यांनी मंद्रुप येथे बोलताना दिली़
----------------------
तालुकानिर्मितीचे पाऊल़़
मंद्रुप तालुका निर्मितीची मागणी अनेक वर्षापासून आहे, पण मंद्रुपमध्ये कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत़ शासकीय इमारतींची वानवा आहे़ त्यामुळे प्रशासकीय कार्यालय सुरू करताना अडचणी येत आहेत़ मंद्रुपमध्ये अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करून तालुका निर्मितीचे पहिले पाऊल सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी टाकल्याचे मानले जाते़
----------------------
प्रशासकीय कामांचे विकेंद्रीकरण़़
मंद्रुप येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू झाल्यास प्रशासकीय कामांचे विकेंद्रीकरण होईल़ नायब तहसिलदारासह काही कर्मचारी या कार्यालयातून दाखले देणे, विविध शासकीय योजनांसाठी अर्ज स्वीकृती आदी कामे केल्याने परिसरातील जनतेची सोय होणार आहे़ 

Web Title: Additional tehsil office in Mandrup, recognition of the principle: The Cooperative Minister gave information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.