भूक नियंत्रित करणारे अन् पचायला सोपे खजूर सोलापुरातील बाजारपेठेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 03:53 PM2022-04-15T15:53:19+5:302022-04-15T15:53:25+5:30

आरोग्यदायी : रमजान महिन्यात वाढली मागणी

" | भूक नियंत्रित करणारे अन् पचायला सोपे खजूर सोलापुरातील बाजारपेठेत दाखल

भूक नियंत्रित करणारे अन् पचायला सोपे खजूर सोलापुरातील बाजारपेठेत दाखल

googlenewsNext

सोलापूर : मुस्लिम बांधवांमध्ये पवित्र समजल्या जाणारे रमजान महिन्यातील रोजा सुरु झाले आहेत. या काळात इफ्तारच्या वेळी खजूर खाऊन उपवास सोडला जातो. कार्बोहायड्रेट्सचे मुबलक प्रमाण असल्याने उपवासाच्या काळात खजुराला विशेष मागणी वाढली आहे. भूक नियंत्रित ठेवण्यास आणि पचनासाठी हे खजूर सोपे असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी व्यक्त केले आहे.

खजूरची विक्री तशी वर्षभर होते. मात्र रमजान महिन्याच्या काळात रोजे (उपवास) करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या काळात खजूरचे अनेक प्रकार उपलब्ध होतात. खजूरचे जवळपास १ हजार प्रकार आहे. त्यापैकी यंदाच्या रमजान काळात ५० हून अधिक प्रकार उपलब्ध झाले आहेत.

सोलापूर शहरामध्ये जवळपास १०० हून अधिक दुकाने आणि हातगाड्यांद्वारे खजूरची विक्री होते. त्यासोबत सुका मेवा ही मिळतो. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यासाठीही डाॅक्टर खजूर खाण्याचा सल्ला देतात. सर्व धर्मीयांमध्ये खजूराला विशेष मागणी आहे. या काळात विविध प्रकारचे खजूर मिळत असल्याने हिंदू बांधवांची ही खरेदीसाठी गर्दी दिसू लागली आहे.

-----

दोन हजार रुपयांपासून दर

खजुराचे जवळपास १ हजार प्रकार आहेत. विजापूर वेस येथील मार्केटमध्ये २ हजार रुपये किलोपासून ते ३०० रुपयांपर्यंतची खजूर उपलब्ध आहे. यामध्ये अज्वा (२ हजार रु. किलो), मरियम (६००), कल्सी (७००), अंबर (१५००) मबरुम (१५००) हे सारे किलो, ५०० ग्रॅम, २५० ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत.

- लूजमध्ये सुलतान (३५० रु. किलो), हारमोनी (३२०), सोलार (३२०), सौदी डेटस् (६००), मदिना (१८००), किमया (३००), इराणी १२०, कपकप (१६०), तनशियन डेट (६००), खुद्री ८००), डेट क्राऊन (२८०),सप्पीट (६४०) असे पन्नासहूवन अधिक प्रकार सोलापुरात मिळू लागल्याचे अब्दुल सत्तार उस्ताद यांनी सांगितले.

----

सौदी, इराणहून येतो माल

- खजूराचे उत्पादन प्रामुख्याने सौदी, अरब, इराण, इराकमध्ये होते. कंटेनरने हा माल मुंबईत येतो. तेथून पँकिंग होते आणि महाराष्ट्रभर त्याचे वितरण केले जाते. ग्राहकांची गरज लक्षात घेता त्याचे २५० ग्रॅमपासून पुढे बॉक्स तयार केले जातात.

- इखलास उस्ताद, व्यापारी

----

खजूर खाण्याचे महत्व

खजूरमध्ये भरपूर फायबर, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते. विशेष म्हणजे, चवीला चांगली असण्यासोबतच, खजूरात औषधी गुणधर्म आहेत. खजूरमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण आहे. दिवसभर आपली भूक नियंत्रित करण्यास मदत करते. खजूर पचायला सोप्या असतात त्यामुळे दीर्घकाळ उपवास केल्यावर पोटाचे विकार जडत नाहीत.

--------------

इफ्तारच्या वेळी खजूर खाल्ल्याने पोट लगेच भरते आणि उपवास सोडल्यानंतर आपण घाईघाईने जास्त अन्न खाणार नाही, ज्यामुळे पचनाचे विकार आणि भविष्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. खजूरमध्ये आढळणारे पोषक घटक ऊर्जेचा स्रोत प्रदान करण्यास मदत करतात. त्यामुळे रमजानच्या पवित्र महिन्यात लोक खजूर खाण्यास प्राधान्य देतात.

- डॉ. अमजद सय्यद

 

Web Title: "

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.