कॉलेज कॅंटींनमध्ये दोन तरूणींमध्ये तूफान हाणामारी, व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 03:47 PM2022-10-11T15:47:50+5:302022-10-11T15:49:34+5:30

Girl Fight Viral Video : हा व्हिडीओ बंगळुरूच्या दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या कॅंटींगमधील असल्याचं सांगितलं जात आहे. आधी तर दोन तरूणींमध्ये केवळ बाचाबाची सुरू असते.

Two girls in college fighting and got slapped video went viral | कॉलेज कॅंटींनमध्ये दोन तरूणींमध्ये तूफान हाणामारी, व्हिडीओ झाला व्हायरल

कॉलेज कॅंटींनमध्ये दोन तरूणींमध्ये तूफान हाणामारी, व्हिडीओ झाला व्हायरल

googlenewsNext

Girls Fight Video: सोशल मीडियावर रोज काहीना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ हैराण करणारे असतात. यात काही भांडणांचे व्हिडीओही व्हायरल होत असतात. असाच एक कॉलेजमधील तरूणींचा भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बंगळुरूच्या एका कॉलेजच्या कॅंटींगमधील आहे. 

हा व्हिडीओ बंगळुरूच्या दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या कॅंटींगमधील असल्याचं सांगितलं जात आहे. आधी तर दोन तरूणींमध्ये केवळ बाचाबाची सुरू असते. पण नंतर दोघीही एकमेकींना मारहाण सुरू करतात. या भांडणामागील कारण स्पष्ट झालेलं नाही. पण त्यांना कुणी रोखण्याचाही प्रयत्न करताना दिसलं नाही.

असाच एक सीसीटीव्ही व्हिडीओ  काही दिवसांआधी समोर आला होता. ज्यात 2 महिला जिममध्ये एका वेट मशीनवर भांडताना दिसल्या होत्या. व्हिडीओत गुलाबी रंगाची टी-शर्ट घातलेली महिला वेट मशीनजवळ तिचा नंबर येण्याची वाट बघत उभी असते. तेव्हाच एक हिरव्या रंगाची टी-शर्ट घातलेली महिला तिथे येते आणि आधी थांबलेल्या महिलेला धक्का देते. नंतर दोघींमध्ये चांगलीच हाणामारी होते.
 

Web Title: Two girls in college fighting and got slapped video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.