Video - हृदयस्पर्शी! रेल्वे स्टेशनवर आई आपल्या लेकाला हाताने भरवतेय जेवण, लोक झाले भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 03:18 PM2023-07-13T15:18:29+5:302023-07-13T15:32:24+5:30

रेल्वे स्टेशनवर बसलेली एक आई आपल्या मुलाला आपल्या हाताने खाऊ घालताना दिसत आहे.

emotional video of mother feeding son with her hands at railway station goes viral | Video - हृदयस्पर्शी! रेल्वे स्टेशनवर आई आपल्या लेकाला हाताने भरवतेय जेवण, लोक झाले भावूक

Video - हृदयस्पर्शी! रेल्वे स्टेशनवर आई आपल्या लेकाला हाताने भरवतेय जेवण, लोक झाले भावूक

googlenewsNext

आपल्या मुलाला कोणत्याही संकटातून वाचवण्यासाठी आई प्रत्येक वादळाशी लढायला तयार असते. जी स्वतः उपाशी राहते, परंतु आपल्या मुलाला उपाशी झोपू देत नाही. कदाचित म्हणूनच असं म्हणतात की आई सर्वांची जागा घेऊ शकते पण आयुष्यात तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. असाच एक आई-मुलाचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

रेल्वे स्टेशनवर बसलेली एक आई आपल्या मुलाला आपल्या हाताने खाऊ घालताना दिसत आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर जिंदगी गुलजार है नावाच्या इन्स्टा अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ट्रेनमध्ये बसलेल्या कोणीतरी हा व्हिडीओ बनवला आहे. हा हृदयस्पर्शी क्षण रेल्वे स्टेशनवरील आहे, जिथे आई आणि मुलगा बसलेले दिसतात. मुलाचे वय साधारण 17 ते 18 वर्ष असेल असा अंदाज आहे. 

शेजारी बसलेल्या आईच्या हातात जेवण आहे. आईने प्रेमाने पहिला तुकडा आपल्या मुलाला खायला दिला आणि नंतर तिने स्वतः खाल्लं. व्हिडिओ शेअर करणार्‍या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'फक्त आईच असते जी स्वतःच्या आधी आपल्या मुलाचा विचार करते'. हे खरोखर खरे आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा इमोशनल व्हिडीओ पाहून लोकही भावूक प्रतिक्रिया देत आहेत. 

एका इंटरनेट युजरने आईनंतर असं प्रेम कोणी करत नाही असं म्हटलं आहे. एकाने लिहिले की, 'मुलाकडे आईसाठी वेळ नसतो, पण प्रत्येक आईसाठी तिचा मुलगाच तिचं आयुष्य असतो.' याशिवाय बहुतेकांनी 'आईसारखं प्रेम कोणीही करू शकत नाही' असे लिहिले आहे. याआधीही आई आणि मुलाचे हृदयस्पर्शी अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: emotional video of mother feeding son with her hands at railway station goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.