मगर झोपली होती; तरुणाने तिच्या पाठीवर हात फिरवला अन्...; अंगावर काटा आणणार Video

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 12:03 PM2023-01-22T12:03:00+5:302023-01-22T12:05:50+5:30

सध्या एका मगरशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो खूपच हैराण करणारा आहे.

Currently, a video related to a crocodile is going viral on social media. | मगर झोपली होती; तरुणाने तिच्या पाठीवर हात फिरवला अन्...; अंगावर काटा आणणार Video

मगर झोपली होती; तरुणाने तिच्या पाठीवर हात फिरवला अन्...; अंगावर काटा आणणार Video

Next

पृथ्वीवर अनेक धोकादायक प्राणी राहतात, ज्यापासून लोकांनी दूर राहण्याचा सल्ला दिला जातो, अन्यथा ते काय करतील यावर विश्वास नाही. सिंह, वाघ आणि बिबट्यासारखे वन्य प्राणी तर मानवासाठी धोकादायक आहेतच, त्याशिवाय मगरीही या बाबतीत कमी नाहीत. एखाद्या व्यक्तीवर हल्ला झाला तर त्याला जगणे कठीण होते. हे असे प्राणी आहेत, जे जमिनीसह आणि पाण्यात देखील धोकादायक असतात.

सध्या एका मगरशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो खूपच हैराण करणारा आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मगरीला छेडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र यामुळे सदर व्यक्ती चांगलाच अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. 

एक मगर जमीनीवर आराम करत होती. सदर व्यक्तीला हे दिसताच त्याने त्या मगरीच्या पाठीवर हात फिरवण्याचा प्रयत्न केला. यामुळे अचानक मगर मागे फिरली आणि सदर व्यक्तीच्या हातावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे त्या व्यक्तीच्या हातातून खूप रक्त वाहू लागते.

सदर व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर animals_powers नावाच्या आयडीने शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत २ लाख २७ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर ७ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, 'हिंसक प्राण्यांवर कधीही विश्वास ठेवू नये'. तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, 'मला माहित होते की मगर त्याला चावेल'.

Web Title: Currently, a video related to a crocodile is going viral on social media.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.