सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कार्य कौतुकास्पद : आनंदराव अडसूळ, ओरोस येथे को-आॅपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन सिंधुदुर्गच्या एकता मेळाव्याचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:16 PM2018-01-12T12:16:13+5:302018-01-12T12:21:41+5:30

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने ग्राहकांना चांगल्या सुविधा दिल्याने बँकेला सहकार क्षेत्रात महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. बँकेत आधुनिक प्रणालींचा अवलंब करीत या बँकेने सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी मारली आहे आणि याचे सर्व श्रेय या बँकेचे संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांना जात आहे. या बँकेने घेतलेली भरारी पाहता ही बँक सहकार क्षेत्रातील राज्यातील नव्हे तर देशातील पहिल्या क्रमांकाची बँक असल्याचे गौरवोद्गार शिवसेनेचे लोकसभा गटनेते खासदार आनंदराव अडसूळ यांनी युनियनच्या एकता मेळाव्यात बोलताना काढले.

The work of Sindhudurg District Bank is appreciated: Inauguration of Co-operative Bank Employees Union, Sindhudurg, at Anandrao Adsul, Oros. | सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कार्य कौतुकास्पद : आनंदराव अडसूळ, ओरोस येथे को-आॅपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन सिंधुदुर्गच्या एकता मेळाव्याचे उद्घाटन

ओरोस येथे को-आॅपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन सिंधुदुर्गच्या एकता मेळाव्याचे उद्घाटन आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते झाले.

googlenewsNext
ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कार्य कौतुकास्पद : आनंदराव अडसूळओरोस येथे को-आॅपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन सिंधुदुर्गच्या एकता मेळाव्याचे उद्घाटनअडसूळ यांचा राष्ट्रवादी पक्षातर्फे सत्कार, राजकीय चर्चेला विराम

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने ग्राहकांना चांगल्या सुविधा दिल्याने बँकेला सहकार क्षेत्रात महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. बँकेत आधुनिक प्रणालींचा अवलंब करीत या बँकेने सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी मारली आहे आणि याचे सर्व श्रेय या बँकेचे संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांना जात आहे. या बँकेने घेतलेली भरारी पाहता ही बँक सहकार क्षेत्रातील राज्यातील नव्हे तर देशातील पहिल्या क्रमांकाची बँक असल्याचे गौरवोद्गार शिवसेनेचे लोकसभा गटनेते खासदार आनंदराव अडसूळ यांनी युनियनच्या एकता मेळाव्यात बोलताना काढले.

को-आॅपरेटीव्ह बँक आॅफ एम्प्लॉईज युनियन सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांचा एकता मेळावा व वेतन करार स्वाक्षरीचा कार्यक्रम येथील शरद कृषी भवन येथे झाला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, बँकेचे संचालक व्हिक्टर डान्टस, प्रज्ञा परब, विकास सावंत, आत्माराम ओटवणेकर, प्रमोद धुरी, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुध्द देसाई, को-आॅपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन सिंधुदुर्गचे कार्याध्यक्ष विष्णू तांडेल, मुंबई युनियनचे नरेंद्र सावंत, ठाणे युनियनचे जनरल सेक्रेटरी प्रदीप पाटील यांच्यासह जिल्हा बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक करताना विष्णू तांडेल म्हणाले की, बँकेच्या हितामध्येच कर्मचाऱ्यांचे हित आहे. बँक जगली तर कर्मचारी जगणार! त्यामुळे जिल्हा बँकेचे कर्मचारी बँकेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत असताना त्यांच्या या कामाबद्दल चांगला मोबदला मिळावा, तसेच बोनस मिळावा यासाठी दर तीन वर्षांनी जिल्हा बँक आणि एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये वेतन करार होत असतो. आणि तो आज होत आहे.

को-आॅपरेटीव्ह बँक आॅफ एम्प्लॉईज युनियन आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांच्या एकता मेळाव्यात बँक कर्मचाऱ्यांच्या वेतन करारावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत आणि युनियनचे अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ यांनी स्वाक्षऱ्या केल्या. तसेच या करारांचे आदान-प्रदान यावेळी करण्यात आले.

यावेळी  खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अग्रगण्य बँकांच्या बरोबरीने काम करीत आहे. महाराष्ट्रात सहकार जोमाने वाढत आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण ही सिंधुदुर्ग जिल्हा बँक आहे. ज्याची पत नाही त्याची पत निर्माण करण्याचे काम या जिल्हा बँकेने केले आहे.

या बँकेला मिळालेला वैकुंठभाई मेहता पुरस्कार, बँको पुरस्कार हेच या बँकेच्या खऱ्या कार्यपद्धतीची ओळख आहेत. यातूनच या बँकेने केलेले काम व तिची प्रगती दिसून येत आहे. जिल्हा बँकेच्या कारभारात कोठेही अनियमितता आढळली आली नाही. त्यामुळेच राज्यातील ३३ जिल्हा बँकांमधून केवळ सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला नोटाबंदी कालावधीतील सुमारे १० कोटी रुपये बदलून मिळाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सतीश सावंत म्हणाले , आज जी जिल्हा बँकेची आकाशभरारी आहे ती या बँकेच्या कर्मचाऱ्यांच्याच जोरावर आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी एखादी गोष्ट मागितली तर ती त्यांना देण्यास आम्ही कधीच टाळाटाळ करीत नाही.
मात्र कर्मचाऱ्यांनी आपले हित सांभाळत असताना खातेदारांच्या ठेवींबाबत गोपनीयता बाळगणे आवश्यक आहे. अशा सूचना करतानाच सुलभ सेवा आणि ग्राहकांचे समाधान हे ध्येय समोर ठेवून जिल्हा बँक देशात नावारूपास येईल असे काम करा, असे प्रतिपादनही सतीश सावंत यांनी केले.

अडसूळ यांचा राष्ट्रवादी पक्षातर्फे सत्कार, राजकीय चर्चेला विराम

को-आॅपरेटीव्ह बँक आॅफ एम्प्लॉईज युनियन आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांचा एकता मेळावा व वेतन करार स्वाक्षरीच्या कार्यक्रमाच्या वेळी को- आॅपरेटीव्ह बँक आॅफ एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांनी पक्षाच्यावतीने पुष्पहार व शाल देऊन सत्कार केला. यावेळी उपस्थितांचे लक्ष या सत्काराकडे होते. मात्र हा सत्कार केवळ बँक कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने असल्याचे सांगत डान्टस यांनी निर्माण होणाऱ्या राजकीय चर्चेला विराम दिला.
 

Web Title: The work of Sindhudurg District Bank is appreciated: Inauguration of Co-operative Bank Employees Union, Sindhudurg, at Anandrao Adsul, Oros.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.