Video - सिंधुदुर्गात पूर परिस्थिती, ठेकेदाराच्या गलथान कारभाराने कणकवली तुंबली 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 03:10 PM2019-06-30T15:10:53+5:302019-06-30T15:49:11+5:30

गेले दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. महामार्ग ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे कणकवली शहरात पाणी साचून लोकांच्या घरात घुसले.

Video heavy rainfall in sindhudurg kankavli | Video - सिंधुदुर्गात पूर परिस्थिती, ठेकेदाराच्या गलथान कारभाराने कणकवली तुंबली 

Video - सिंधुदुर्गात पूर परिस्थिती, ठेकेदाराच्या गलथान कारभाराने कणकवली तुंबली 

googlenewsNext
ठळक मुद्देगेले दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. महामार्ग ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे कणकवली शहरात पाणी साचून लोकांच्या घरात घुसले. सावंतवाडीतील मोती तलाव काठोकाठ भरून वाहू लागला आहे.

सिंधुदुर्ग - गेले दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. महामार्ग ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे कणकवली शहरात पाणी साचून लोकांच्या घरात घुसले. सावंतवाडीतील मोती तलाव काठोकाठ भरून वाहू लागला आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. तर अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे.

गेले दोन-तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठिकाणी पाण्याची पातळी वाढली आहे. तर काही ठिकाणी पडझड झाल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. या वर्षीच्या उन्हाळ्यात येथील मोती तलावाचे पाणी मोठ्या प्रमाणात आटले होते. तर शहरालगतच्या काही भागात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते.यावर्षी पावसाने उशिरापर्यंत पाठ फिरवल्यामुळे नागरिक चिंतेत होते.मात्र दोन-तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाने सर्वांना तृप्त करून सोडले आहे.

कणकवली तुंबली

मुंबई-गोवा महामार्ग ठेकेदाराने कणकवलीत पुलाचे काम करताना पावसाळ्यातील पाण्याचे नियोजन न केल्याने शहरातील पिण्याचा निचरा होत नव्हता. परिणामी विविध भागात पाणी साचून ते लोकांच्या घरात घुसले आहे. 

Web Title: Video heavy rainfall in sindhudurg kankavli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.