राजकीय हेतूने गैरसमज पसरवण्याचे काम, 'त्या' नोटिसींचा आणि पंतप्रधान, राष्ट्रपती दौऱ्याचा संबंध नाही - तोरसकर  

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 27, 2023 03:44 PM2023-10-27T15:44:43+5:302023-10-27T15:46:28+5:30

मालवण : प्रशासनाने मालवण किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासंदर्भात संबंधित व्यावसायिक यांना नोटिसा बजावल्या आहेत या नोटिसा लोकशाही दिनात उपस्थित ...

The notice issued regarding the removal of unauthorized constructions on the Malvan coast is not related to the visit of the Prime Minister, the President | राजकीय हेतूने गैरसमज पसरवण्याचे काम, 'त्या' नोटिसींचा आणि पंतप्रधान, राष्ट्रपती दौऱ्याचा संबंध नाही - तोरसकर  

राजकीय हेतूने गैरसमज पसरवण्याचे काम, 'त्या' नोटिसींचा आणि पंतप्रधान, राष्ट्रपती दौऱ्याचा संबंध नाही - तोरसकर  

मालवण : प्रशासनाने मालवण किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासंदर्भात संबंधित व्यावसायिक यांना नोटिसा बजावल्या आहेत या नोटिसा लोकशाही दिनात उपस्थित केलेल्या एका नागरिकाच्या तक्रारीच्या अनुषंगाने बजावण्यात आल्या आहेत. या नागरिकाने पर्यटन व्यावसायिक यांच्या अनधिकृत बांधकामामुळे आपल्या व्यवसायावर तसेच वहिवाटीवर बाधा येत आहे, तसेच अतिक्रमणावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

त्या अनुषंगाने प्रशासनाने सबंधित व्यक्तींना नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मालवण भेट याचा दुरान्वये सबंध नाही. काही राजकीय हेतूने प्रेरित माणसे व्यापारी, पर्यटन व्यावसायिक तसेच मच्छीमार यामध्ये गैरसमज पसरवून वातावरण बिघडविण्याचे काम करीत असल्याचे भाजप मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

विशेष म्हणजे यातील तक्रारदार नागरिक हा मविआ आघाडीचा पदाधिकारी आहे. पंतप्रधान व राष्ट्रपती यांचा नौदल दिनानिमित्त होणारा मालवण दौरा ऐतिहासिक असून मालवण तसेच सिंधुदुर्ग किल्ला जगाच्या नकाशावर येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोटमध्ये होणाऱ्या पुतळ्यामुळे पर्यटनाचे नवीन ठिकाण निर्माण होत आहे. त्याचा फायदा स्थानिक व्यापारी, पर्यटन व्यावसायिक तसेच मच्छीमार यांनाच होणार आहे. त्यामुळे मच्छीमार व पर्यटन व्यावसायिकांनी टोकाची भूमिका घेऊ नये तसेच कुठच्याही अफवेला बळी पडू नये. 

त्याचबरोबर तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन सोबत संबंधित विषयात चर्चा चालू आहे. लवकरच तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांची मच्छीमार तसेच पर्यटन व्यावसायिकांसोबत बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तरी, मच्छीमार व पर्यटन व्यावसायिकांनी आंदोलनात्मक पवित्रा न घेता प्रशासनाशी संवाद साधावा व त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत, असेही आवाहन या प्रसिद्धिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Web Title: The notice issued regarding the removal of unauthorized constructions on the Malvan coast is not related to the visit of the Prime Minister, the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.