सिंधुदुर्ग : कसवण गावातील शिवारे झाली जलयुक्त, पिण्याच्या पाण्याचीही मुबलकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 03:32 PM2018-11-03T15:32:20+5:302018-11-03T15:36:28+5:30

कणकवली तालुक्यातील कसवण-तळवडे हे १६७३ लोकवस्तीचे गाव. परंपरागत भात शेती करण हे येथील शेतकरी बांधवांचे काम. जलयुक्त शिवार योजनेमुळे या गावातील शेतीचा काया-पालट होण्याबरोबरच रब्बी म्हणजे उन्हाळी हंगामात येथील शेतकऱ्यांनी उमेदीने शेतीची कास धरली.

 Sindhudurg: Water tanker in Kaswan village, water supply and drinking water | सिंधुदुर्ग : कसवण गावातील शिवारे झाली जलयुक्त, पिण्याच्या पाण्याचीही मुबलकता

कसवण-तळवडे गावातील या जलयुक्त शिवार योजनेची पाहणी जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग व अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली. यावेळी माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, पत्रकार चंद्रशेखर देसाई, भगवान लोके, महेश सरनाईक, अजित सावंत, चंद्रशेखर तांबट, उपसरपंच गोपीनाथ सावंत, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल राठोड उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देकसवण गावातील शिवारे झाली जलयुक्त, पिण्याच्या पाण्याचीही मुबलकतासिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिकारी, पत्रकारांचा पाहणी दौरा

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील कसवण-तळवडे हे १६७३ लोकवस्तीचे गाव. परंपरागत भात शेती करण हे येथील शेतकरी बांधवांचे काम. जलयुक्त शिवार योजनेमुळे या गावातील शेतीचा काया-पालट होण्याबरोबरच रब्बी म्हणजे उन्हाळी हंगामात येथील शेतकऱ्यांनी उमेदीने शेतीची कास धरली.

कसवण-तळवडे गावातील या जलयुक्त शिवार योजनेची पाहणी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग व अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत पत्रकार दौरा आयोजित केला होता. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल राठोड, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, पत्रकार चंद्रशेखर देसाई, महेश सरनाईक, चंद्रकांत तांबट, भगवान लोके, अजित सावंत, सुषार सावंत या सर्वांसह या गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी कशी वाढली, सिमेंट नाला बांध आदी कामांच्या प्रत्यक्ष पाहणीबरोबरच गावातील शेतकºयांशी संवाद साधला.

कृषी सहाय्यक आर. आर. गावकर, वैष्णवी ठाकूर, सी. एम. कदम, कृषी पर्यवेक्षक एस. ए. कोटला, उपसरपंच गोपीनाथ सावंत यांनी गावाचे लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या तसेच ग्रामसेवक एकनाथ चव्हाण यांनी कसवण-तळवडेचा ९२ लक्ष ८८ हजार रुपयांचा आराखडा तयार केला. समिती सदस्य मनोहर मालंडकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

या गावाच्या परिसरात जलयुक्त शिवार आराखड्यानुसार २ नवीन तर ३ जुन्या सिमेंटनाला बांधची दुरुस्ती, १९ विहिरीतील गाळ काढण्यात आला. कोल्हापूर पद्धतीच्या व भूमिगत आशा एकूण पाच बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली.

यासर्व कामांमुळे या दोन्ही गावच्या परिसरात फळझाड लागवडीचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली. सुमारे २५0 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर शेतकऱ्यांनी फळझाड लागवड केली. मुबलक पाणी उपलब्धतेमुळे उन्हाळी हंगामात येथील शेतकरी मूग, चवळी, कुळीथ, भूईमूग अशी पिक घेऊ लागले आहेत. मे महिन्यात या परिसरातील विहिरी कोरड्या पडायच्या. पण आता मे महिन्यातही परिसरातील विहिरींना मुबलक पाणी उपलब्ध झाले. गावच्या परिसरातील कलेश्वरवाडीतील कुलकर्णी विहिरीत पिण्याचे पाणी उपलब्ध झाले.

सागवान, आंबा कलमांची लागवड

याच गावातील शेतकरी प्रशांत दळवी यांनी आपल्या तीन एकर शेतीत एक हजार सागवान तर दहा आंबा कलमांची यशस्वी लागवड केली आहे. याचबरोबर आंतरपिक भूईमूग व कुळीथ ही पिके ते घेतात. गतवर्षी त्यांनी अंतरपिक म्हणून हळदीची लागवड केली होती. केवळ पाणी उपलब्ध झालं म्हणून मी हे सर्व करु शकलो असे दळवी यावेळी म्हणाले, याच बरोबर त्यांनी यंदाच्या वर्षी बांबू लागवड करण्याचा निर्धार केला आहे.

श्री पद्धतीने भात लागवडीतून दुप्पट उत्पादन

गावातील शेतकरी प्रशांत दळवी, जगन्नाथ राणे, बापूशेठ कसवणकर, उदय सावंत, सखाराम गावकर, विनय राणे यांचाही अनुभव हिरवी पिक डोलणारी शिवार झाली असाच आहे. यापूर्वी उन्हाळी शेती हा विषय बोलण्यापुरताच मर्यादीत होता. पण आता उन्हाळी म्हणजेच रब्बी हंगामाच क्षेत्र वाढू लागले आहे. चवळी, मूग, भूईमूग याच बरोबर उन्हाळ्यात कलिंगडाचं पिकही यशस्वी केले आहे. या भागातील शेतकºयांनी भाताची श्री पद्धतीने लागवड करुन भाताचे उत्पन्न दुप्पट केले आहे. श्री पद्धतीने भात लागवड करण्यासाठी या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर प्रवृत्त होत आहेत.

फळझाड लागवड क्षेत्रातही वाढ

विहिरीतील गाळ काढण्याच्या कार्यक्रमामुळे तसेच या परिसरात झालेल्या सिमेंट नाला बांध, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती यामुळे विहिरींच्या पाणी पातळीत लक्षणीय फरक पडला. सुमारे एक मीटरने पाणी पातळी वाढण्यास मदत झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेतील या विविध कामांमुळे उन्हाळी शेती क्षेत्रात वाढ होण्याबरोबरच फळझाड लागवड क्षेत्रातही वाढ होत आहे.

 

Web Title:  Sindhudurg: Water tanker in Kaswan village, water supply and drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.