सिंधुदुर्ग : आर्चरी कार्निव्हल मध्ये सिंधुदुर्गातील खेळाडूंचा सहभाग, नागपुर येथे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 05:07 PM2018-11-14T17:07:34+5:302018-11-14T17:09:37+5:30

देशातील सर्वात मोठया आर्चरी कार्निव्हलला नागपुर रेशिम बाग़ मैदान येथे मंगळवारी उत्साहात प्रारंभ झाला. या कार्निव्हल मध्ये देशभरातून 2500 आर्चर्स ( खेळाडू ), त्यांचे प्रशिक्षक सहभागी झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंचा संघही या कार्निव्हल मध्ये सहभागी झाला आहे.

Sindhudurg: The participation of Sindhudurg players in the Archdi Carnival, organized at Nagpur | सिंधुदुर्ग : आर्चरी कार्निव्हल मध्ये सिंधुदुर्गातील खेळाडूंचा सहभाग, नागपुर येथे आयोजन

नागपुर येथील आर्चरी कार्निव्हल मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून क्रीड़ा तज्ज्ञ भालचंद्र कुलकर्णी यांच्यासह खेळाडू सहभागी झाले आहेत.

Next
ठळक मुद्देआर्चरी कार्निव्हल मध्ये सिंधुदुर्गातील खेळाडूंचा सहभागनागपुर येथे आयोजन

कणकवली : देशातील सर्वात मोठया आर्चरी कार्निव्हलला नागपुर रेशिम बाग़ मैदान येथे मंगळवारी उत्साहात प्रारंभ झाला. या कार्निव्हल मध्ये देशभरातून 2500 आर्चर्स ( खेळाडू ), त्यांचे प्रशिक्षक सहभागी झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंचा संघही या कार्निव्हल मध्ये सहभागी झाला आहे.

महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन व नागपुर महानगर पालिका सहआयोजक असलेल्या या आर्चरी कार्निव्हलला चांगला प्रतिसाद लाभला आहे. 9, 14, 17 वयोगटातील स्पर्धेची प्राथमिक फेरीला मंगळवारी सूरूवात झाली.

त्याचबरोबर आर्चरी या खेळात असलेल्या संधी बाबत प्रमोद चांदुरकर तर आर्चरी परफेक्शन व स्किल डेव्हलपमेंट याबाबत भारतीय महिला आर्चरी प्रशिक्षक पूर्णिमा महातो यांनी मार्गदर्शन केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून क्रीड़ा तज्ज्ञ भालचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जयश्री कसालकर, आसावरी कुलकर्णी, मानसी मुरकर, अंगारकी राणे, मृण्मयी पडवळ, अविराज खांडेकर, प्रथमेश पावसकर, हार्दिक गोसावी हे खेळाडू सहभागी झाले आहेत.

 

Web Title: Sindhudurg: The participation of Sindhudurg players in the Archdi Carnival, organized at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.