मालवण सागरी अभयारण्यातून सिंधुदुर्ग किल्ला परिसर वगळणार, नव्या तीन जागांचा होणार समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 11:50 AM2023-04-11T11:50:42+5:302023-04-11T11:50:59+5:30

बहुचर्चित मालवण सागरी अभयारण्याच्या सिमांबाबत निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला

Sindhudurg fort area will be excluded from Malvan marine sanctuary, three new places will be included | मालवण सागरी अभयारण्यातून सिंधुदुर्ग किल्ला परिसर वगळणार, नव्या तीन जागांचा होणार समावेश

मालवण सागरी अभयारण्यातून सिंधुदुर्ग किल्ला परिसर वगळणार, नव्या तीन जागांचा होणार समावेश

googlenewsNext

संदीप बोडवे

मालवण: बहुचर्चित मालवण सागरी अभयारण्याच्या सिमांबाबत निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला आहे. भारतीय वन्यजीव संस्थांनच्या माध्यमातून मालवण किनारपट्टीवरील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण जागांच्या अभ्यासाअंती त्याच्या प्रारूप आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. या महत्त्वपूर्ण अभ्यासामुळे १९८७ मधील मालवण सागरी अभयारण्याची सीमा रद्द होऊन नव्याने कवडा रॉक, सात मंडळ खडक आणि लाईट हाऊस या जैवविविधतेचे संपन्न असलेल्या जागांचा आता मालवण सागरी अभयारण्यात समावेश होणार आहे. तर सिंधुदुर्ग किल्ला परिसर यातून वगळण्यात येणार आहे. 

मालवण सागरी अभयारण्याच्या सीमांचा पुनर्विचार करताना सर्वप्रथम अभयारण्याच्या आसपासच्या सागरी जैवविविधतेने संपन्न असलेल्या जागांचा शोध घेणे गरजेचे होते. यासाठी कांदळवन विभागाने डब्ल्युआयआयची नियुक्ती केली होती.

मालवण सागरी क्षेत्राचा अभ्यास करताना डब्ल्यूआयआय च्या अभ्यासकांनी सागरी जैव विविधता असलेल्या क्षेत्राची सहा भागांमध्ये विभागणी केली होती. या पैकी क्षेत्रे पुढील -  उच्च जैवविविधता आणि अधिक मानवी हस्तक्षेप असलेल्या तीन जागा सागरी अभयारण्यातून वगळण्याचे सूचित केले आहे. त्या पुढील प्रमाणे- 

चिवला - मासेमारीची जागा, सागरी पर्यटन उपक्रम, मृत आणि ब्लिच झालेले प्रवाळ. 
किंग्ज गार्डन - मृत कोरल, 
सरसॅगम पॉईंट - मासेमारीची जागा, सागरी पर्यटन, 

▪️मालवण सागरी अभयारण्य (१९८७)- २९.१२ चौरस किमी. ▪️१९ -प्रवाळ प्रजाती ▪️१२२ - प्रकारचे मासे ▪️ प्रकारचे सागरी गवत ▪️४७ - प्रकारचे खाण्या योग्य मासे अभ्यासात आढळले.

डब्ल्युआयआयने केलेल्या अभ्यासादरम्यान मालवण सागरी क्षेत्रात उच्च सागरी जैवविविधता आणि कमी मानवी हस्तक्षेप असलेल्या तीन जागा आढळून आल्या. या जगांचा सागरी अभयारण्यात समावेश होणार आहे. 

  • कवडा रॉक - (३.३९ चौरस किमी) याठिकाणी ३२ प्रकारचे मासे आणि सागरी पक्षांचा अधिवास आढळला. 
  • सात मंडल - (१६.२१ चौरस किमी) प्रवाळ आणि माशांच्या विविध प्रजाती आढळल्या. याठिकाणी पारंपारिक पद्धतीची मासेमीरी होते. 
  • लाईट हाऊस - (१३.३३ चौरस किमी) याठिकाणी १० कोरल प्रजाती, विविध मासे, मालवण मध्ये अन्य कुठेही न आढळणारे मऊ प्रवाळ आणि सागरी गवत, स्विफ्ट लेट पक्षी, तसेच ब्लॅक टीप व हॅमर हेड शार्क आदींचा अधिवास आहे.

सागरी गवत आढळले

  • सिंधुदुर्ग किल्ला आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर तसेच चिवला बीच सागरी भाग प्रस्तावित सागरी अभयारण्यातून वगळण्यात येऊ शकतो. 
  • मालवणच्या सागरी क्षेत्रामध्ये सरसॅगम आणि किंग्ज गार्डन या भागात सागरी गवत आढळले. हे पहिल्यांदाच रेकॉर्ड झाले आहे. 
  • नव्याने सूचित केलेल्या जागांचे क्षेत्र १९८७ मधील घोषित मालवण सागरी अभयारण्याच्या एकूण २९.१२ चौरस किमी क्षेत्रा इतकेच आहे. 

Web Title: Sindhudurg fort area will be excluded from Malvan marine sanctuary, three new places will be included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.