सिंधुदुर्ग : मद्यधुंद पर्यटकांचा धिंगाणा, दोडामार्ग बाजारपेठेतील प्रकार : शाब्दिक बाचाबाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 06:14 PM2018-05-26T18:14:35+5:302018-05-26T18:14:35+5:30

जीवाचा गोवा करून आलेल्या मद्यधुंद पर्यटकांनी शुक्रवारी दोडामार्ग बाजारपेठेत धिंगाणा घातला. या धिंगाण्यात पर्यटकांची चारचाकी दुचाकीला लागून अपघातही झाला. यावरून दुचाकीस्वार व पर्यटकांत शाब्दिक बाचाबाची होऊन वातावरण तंग झाले.

Sindhudurg: Dingana, popular among tourists by wine tourists. Type of market: Textual vigil | सिंधुदुर्ग : मद्यधुंद पर्यटकांचा धिंगाणा, दोडामार्ग बाजारपेठेतील प्रकार : शाब्दिक बाचाबाची

ग्रामस्थ आणि पर्यटक यांच्यात झालेल्या वादामुळे दोडामार्ग बाजारपेठेत गर्दी झाली होती.

googlenewsNext
ठळक मुद्दे मद्यधुंद पर्यटकांचा धिंगाणादोडामार्ग बाजारपेठेतील प्रकार शाब्दिक बाचाबाची

दोडामार्ग : जीवाचा गोवा करून आलेल्या  मद्यधुंद पर्यटकांनी शुक्रवारी दोडामार्ग बाजारपेठेत धिंगाणा घातला. या धिंगाण्यात पर्यटकांची चारचाकी दुचाकीला लागून अपघातही झाला. यावरून दुचाकीस्वार व पर्यटकांत शाब्दिक बाचाबाची होऊन वातावरण तंग झाले.

वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्नही पर्यटकांनी केला. अखेर पर्यटकांच्या गाडीत असलेल्या माहिलांनी झाल्या प्रकाराची माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

गेल्या दोन वर्षात दोडामार्ग शहरात दारूच्या नशेत पर्यटकांकडून धिंंगाणा घालणे, राडा करणे आणि स्थानिकांना मारहाण करण्याचा प्रकार अनेकदा घडला. त्यामुळे शांत असलेले दोडामार्ग अनेकदा अशांत बनले. वर्षा पर्यटनासाठी मांगेलीत येणाऱ्या पर्यटकांकडून अनेकदा असे प्रकार घडले. असाच प्रकार शुक्रवारी दोडामार्गमध्ये घडला.

कोल्हापूर येथील पर्यटक गोव्यात फिरायला गेले होते. त्याठिकाणी मद्याचे घोट रिचवित जीवाचा गोवा केल्यानंतर ते परतीच्या प्रवासाला निघाले. दोडामार्ग बाजारपेठेत काही वेळ ते थांबले. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या महिला खरेदीसाठी गेल्या.

यादरम्यान आधीच मद्यधुंद असलेल्या त्या पर्यटकांमध्ये वाद सुरू झाला. त्यातच त्यातील एकाने गाडीचा क्लज दाबल्याने त्यांची चारचाकी समोर उभ्या करून ठेवलेल्या दुचाकीला धडकली. त्यामुळे दुचाकीस्वार व पर्यटकांमध्ये नुकसान भरपाईवरून वाद सुरू झाला.
प्रकरण हातघाईवर आले. याची माहिती वाहतूक पोलीस राजा राणे यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.

मात्र मद्यधुंद पर्यटकांनी त्यांच्याशीही हुज्जत घालून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण आणखीनच चिघळले. अखेर पर्यटकांसोबत असलेल्या महिलांनी माफी मागितल्यानंतर या प्रकारावर पडदा पडला.

मद्यधुंद पर्यटकांना आपण काय बोलतो त्याचेही भान नव्हते. घटनास्थळी दाखल झालेले वाहतूक पोलीस राजा राणे यांच्याशी त्यांनी अरेरावी केली. त्यांच्या अंगावरही धावून गेले.
तुमच्या हातून काय कारवाई होणार हे माहिती आहे. तुम्ही फक्त एफआयआरच दाखल करणार ना? खुशाल करा, अशी उध्दट भाषा वापरली.
 

Web Title: Sindhudurg: Dingana, popular among tourists by wine tourists. Type of market: Textual vigil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.