सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतमालासाठी प्रत्येक तालुक्यात विक्री केंद्र : सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 04:58 PM2017-11-02T16:58:31+5:302017-11-02T17:09:39+5:30

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आता आरोग्यदायी सेंद्रीय पद्धतीने पिकवित आहेत. मात्र, त्यांच्या या शेतमालाला शासनाच्या धोरणानुसार थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावे यादृष्टीने प्रत्येक तालुक्यात विक्री केंद्र सुरू करणार असल्याची माहिती भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस बाळासाहेब सावंत यांनी कुडाळ आणि कणकवली येथे झालेल्या बैठकीत दिली.

Sale centers in every taluka for farmland in Sindhudurg district: Sawant | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतमालासाठी प्रत्येक तालुक्यात विक्री केंद्र : सावंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतमालासाठी प्रत्येक तालुक्यात विक्री केंद्र : सावंत

Next
ठळक मुद्देशेतमालाला थेट बाजारपेठ उपलब्ध होणार भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस बाळासाहेब सावंत यांची माहितीसिंधुदुर्ग जिल्ह्यात सेंद्रीय पद्धतीने पिकवलेली पिके आरोग्यदायी सिंधुदुर्ग भाजप किसान मोर्चा बैठक कणकवलीत

कणकवली ,दि. ०२ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आता पूर्वीप्रमाणे भातशेती व्यतिरिक्त अन्य नगदी पिकांकडे वळत आहे. ही पिके आरोग्यदायी सेंद्रीय पद्धतीने पिकवित आहेत. मात्र, त्याची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्यांच्या या शेतमालाला शासनाच्या धोरणानुसार थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावे यादृष्टीने प्रत्येक तालुक्यात विक्री केंद्र सुरू करणार असल्याची माहिती भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस बाळासाहेब सावंत यांनी कुडाळ आणि कणकवली येथे झालेल्या बैठकीत दिली.


भाजप किसान मोर्चा सिंधुदुर्गच्या कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकारी, यांची बैठक कुडाळ एमआयडीसी विश्रांतीगृह तर कणकवली, वैभववाडी, देवगड तालुक्यातील पदाधिकारी आदींची बैठक कणकवली शासकीय विश्रामगृहात झाली. त्यावेळी सावंत बोलत होेते.

कुडाळच्या बैठकीस सूर्यकांत दळवी, सदानंद राऊळ, दोडामार्ग तालुकाध्यक्ष डॉ. बाबासाहेब राणे, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष कृषी उद्योजक डॉ. सचिन दळवी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष तुकाराम आमोणकर, कुडाळचे गुरूनाथ पाटील, कुडाळ पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमळकर, महिला बचतगट प्रमुख दीपा काळे, हर्षदा कानिवडेकर, मालवण तालुकाध्यक्ष नंदकिशोर नरे, प्रा. संदीप शिऊलकर, डॉ. सुधीर राणे, प्रगतशील शेतकरी माधव शेगले, रमाकांत ठाकूर, कणकवलीच्या बैठकीस तालुकाध्यक्ष गणपत चव्हाण, वैभववाडी तालुकाध्यक्ष समाधान काडगे, देवगड समीर आचरेकर, तुकाराम गावकर, विजय शेट्ये आदी उपस्थित होते. या सर्वांनी चर्चेत भाग घेतला.


सावंत यांनी तालुकास्तरावर विक्री केंद्रासाठी दुकानगाळे उपलब्ध व्हावेत यासाठी तालुकास्तरीय नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देण्यात आली आहेत. अशी माहिती देऊन ते म्हणाले, ही कामे मार्गी लावण्याच्यादृष्टीने लवकरच भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाºयांची भेट घेणार आहोत. किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमृत चौघुले हे राज्यस्तरीय किसान मोर्चाच्या बैठकीसाठी मुंबईत गेल्याने त्या बैठकीना उपलब्ध राहू शकले नाहीत.

शेतीविषयक योजना

शेतकºयांच्या हिताच्यादृष्टीने जिल्हास्तरीय कृषी आणि पशुपालन समिती निर्माण करावी, अल्प भूधारक शेतकºयांना पशुपालन समिती निर्माण करावी, अल्पभूधारक शेतकºयांना पशुपालन योजनेचा लाभ मिळावा. सर्प, प्राणी आणि पर्यावरण मित्र यांना वनविभागाने स्वयंसेवक म्हणून ओळखपत्रे द्यावीत, शासनाच्या शेतीविषयक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी किसान मोर्चा काम करणार आहे.

Web Title: Sale centers in every taluka for farmland in Sindhudurg district: Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.