Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक राजन आंगणे यांचे निधन 

By अनंत खं.जाधव | Published: March 18, 2024 11:10 PM2024-03-18T23:10:54+5:302024-03-18T23:11:22+5:30

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध क्रेशर उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते राजन वामन आंगणे (61 रा.भैरववाडी कारिवडे सावंतवाडी )येथील राहत्या घरी सोमवारी सायंकाळी निधन झाले.

Renowned entrepreneur Rajan Angane of Sindhudurg district passed away | Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक राजन आंगणे यांचे निधन 

Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक राजन आंगणे यांचे निधन 

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध क्रेशर उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते राजन वामन आंगणे (61 रा.भैरववाडी कारिवडे सावंतवाडी )येथील राहत्या घरी सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सावंतवाडी शहरावर दुखाचा डोंगर पसरला आहे.राजन आंगणे हे मूळचे मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील असले तरी त्याचे वास्तव्य सावंतवाडी येथेच होते.तसेच सामाजिक क्षेत्रातही मोठा वावर होता.

राजन आंगणे हे सामाजिक कार्यात अग्रेसर असे व्यक्तिमत्व होते. ते मूळचे मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील असले तरी ते व्यवसायानिमित्त कारिवडे भैरववाडी येथे स्थायिक झाले होते.तेथेच त्यांनी त्रिमूर्ती स्टोन क्रेशर या नावाने उद्योग व्यवसाय उभा केला होता.तसेच बाजूला निवासस्थान होते.सोमवारी सकाळ पासून दुपारपर्यंत क्रेशर वर काम केल्यानंतर तेथच राहत्या घरी विश्रांती साठी गेले होते.

मात्र सायंकाळ पर्यत निवासस्थानातून बाहेर आले नसल्याने तेथील कामगार  पाहायला गेला त्यावेळी ते प्रतिसाद देत नव्हते.त्यामुळे त्याच्या कामगारांनी सहकार्याना बोलविले तसेच शेजाऱ्यांना सागितले.व तातडीने त्यांना सावंतवाडीतील रूग्णालयात हलविले मात्र तत्पूर्वीच त्याचे निधन झाले होते.राजन आंगणे याच्या निधनाचे वृत्त समजताच सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी रूग्णालयात गर्दी केली होती.

आंगणे यांनी सावंतवाडीतील सामाजिक क्षेत्रात मोठे काम केले होते.तसेच भाई साहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या संचालक मंडळावर गेले वीस वर्षे कार्यरत होते.हेल्पलाईन मित्रमंडळाच्या माध्यमातून ही ते सामाजिक क्षेत्रात अग्रेसर होते.त्याच्या पश्चात भाऊ वहिनी पुतणे असा परिवार आहे.

सर्वाचे राजन भाई
राजन आंगणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषता सावंतवाडी परिसरात राजन भाई म्हणून प्रसिद्ध होते.त्याच्या कडे मदतीसाठी येणारी कोणतीही व्यक्ती रिकाम्या हाताने परतत  नव्हती त्यामुळेच ते सर्वसामान्य लोकांमध्ये प्रसिद्ध होते.आज त्याच्या निधनाचे वृत्त समजताच रूग्णालयात परिसरात मोठी गर्दी झाली होती.

Web Title: Renowned entrepreneur Rajan Angane of Sindhudurg district passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.