राणेंचा कचरा प्रकल्प हा केवळ निवडणूक स्टंट : सुशांत नाईक यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 02:03 PM2019-02-05T14:03:32+5:302019-02-05T14:05:45+5:30

आमदार राणेंचा कचरा प्रकल्प हा केवळ निवडणूक स्टंट आहे. त्यांनी तीन एकर जागेत ९०० कोटी रुपये खर्च करून दाखवावेच, असे आव्हानही शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिले. येथील विजय भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Rana's garbage project is the only election stunt: Sushant Naik's criticism | राणेंचा कचरा प्रकल्प हा केवळ निवडणूक स्टंट : सुशांत नाईक यांची टीका

राणेंचा कचरा प्रकल्प हा केवळ निवडणूक स्टंट : सुशांत नाईक यांची टीका

ठळक मुद्देराणेंचा कचरा प्रकल्प हा केवळ निवडणूक स्टंट : सुशांत नाईक यांची टीकातीन एकर जागेत ९०० कोटी रुपये खर्च करून दाखवावेच

कणकवली : अवघ्या तीन एकर जागेत ९०० कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या कचरा प्रक्रिया प्रकल्पातून सोन्याचा धूर निघणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करतानाच आमदार राणेंचा कचरा प्रकल्प हा केवळ निवडणूक स्टंट आहे. त्यांनी तीन एकर जागेत ९०० कोटी रुपये खर्च करून दाखवावेच, असे आव्हानही शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिले. येथील विजय भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहरप्रमुख शेखर राणे, बाळू पारकर, तेजस राणे, नगरसेविका मानसी मुंज, योगेश मुंज आदी उपस्थित होते.

यावेळी सुशांत नाईक म्हणाले, विरोधकांना ९०० कोटींच्या प्रकल्पातील काय कळणार? असा प्रश्न आमदार नीतेश राणे यांनी कणकवली पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित केला होता. खरे तर हा कचरा प्रक्रिया प्रकल्प म्हणजे निवडणूक स्टंट आहे.

आजवर नीतेश राणेंचे रिव्हर राफ्टींग, औषध आपल्या दारी, मोफत वायफाय, मोकाट कुत्रे पकडणे मोहीम आदी सर्वच प्रकल्प सुरू झाले आणि अल्पावधीत बंद पडले. तशीच परिस्थिती या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही जनतेला जागरूक करीत आहोत.

कणकवलीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी नगरपंचायतीने ३ एकर जागा भाडेतत्त्वावर दिली आहे. या जागेत प्रतिदिन १७५ मेट्रीक टन कचरा साठविणे अवघड आहे. तरीही एवढ्याशा जागेत ९०० कोटी रुपये खर्च करून कचरा प्रकल्प कसा काय होणार.

हा प्रकल्प साकारणाऱ्या ए. जी. डॉटर्स या कंपनीने नगरपंचायतीशी करार केला आहे. मात्र या करारात प्रकल्पासाठी कुठली यंत्रसामग्री वापरणार, कचरा प्लांट किती जागेत असणार, कचऱ्यावर प्रक्रिया झाल्यानंतर उर्वरित माल कुठे टाकला जाणार याचा कोणताही उल्लेख केलेला नाही.

अशाप्रकारे अनेक मुद्यांचा उल्लेख करार पत्रावर करण्यात आलेला नाही. त्यामुळे जर या कंपनीचे नुकसान झाले तर नगरपंचायत विरोधात न्यायालयात जाण्याचे अधिकार एकप्रकारे सत्ताधाऱ्यांनी ए. जी. डॉटर्स कंपनीला दिले आहेत. केवळ आगामी निवडणुकांमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा प्रचाराचा मुद्दा बनविला जाणार असल्याची टीका सुशांत नाईक यांनी यावेळी केली.

प्रकल्पाला आमचा विरोध नाही

कणकवलीत ए. जी. डॉटर्सकडून होत असलेला कचरा प्रकल्प झालाच पाहिजे. तोदेखील ९०० कोटींचा असायला पाहिजे. १०-२० कोटींचा प्रकल्प करून नागरिकांची फसवणूक आमदार राणेंनी करू नये. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक होईपर्यंत हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे. या प्रकल्पाला आमचा विरोध नसून तो प्रकल्प होण्यासाठीच आमचा प्रयत्न असेल, असे नगरसेवक सुशांत नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Rana's garbage project is the only election stunt: Sushant Naik's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.