पडवे येथे जुगार अड्ड्यावर छापा, वाहनांसह १४ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 02:32 PM2019-06-25T14:32:14+5:302019-06-25T14:32:53+5:30

पडवे येथील काजरोबा मंदिराच्या मागच्या बाजूला सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण व सिंधुदुर्गनगरी पोलीस पथकाने छापा टाकून रोख ९८ हजार रुपये, तीनपानी पत्ते, खुर्च्या व वाहनांसह १४ जणांना ताब्यात घेतले. 

Printout on gambling at Padwa, 14 vehicles including vehicles | पडवे येथे जुगार अड्ड्यावर छापा, वाहनांसह १४ जण ताब्यात

पडवे येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून विविध साहित्य जप्त करण्यात आले.

googlenewsNext
ठळक मुद्देपडवे येथे जुगार अड्ड्यावर छापावाहनांसह १४ जण ताब्यात

ओरोस : पडवे येथील काजरोबा मंदिराच्या मागच्या बाजूला सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण व सिंधुदुर्गनगरी पोलीस पथकाने छापा टाकून रोख ९८ हजार रुपये, तीनपानी पत्ते, खुर्च्या व वाहनांसह १४ जणांना ताब्यात घेतले. 

कुडाळ तालुक्यातील पडवे काजरोबा मंदिराच्या मागे तीन पत्ती जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग गुन्हा अन्वेषण व सिंधुदुर्ग पोलिसांंच्या पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम व स्थानिक गुन्हा अन्वेषणचे प्रल्हाद पाटील, रविराज फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली  ही कारवाई केली.

सिंधुदुर्गनगरी मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर केलेल्या या कारवाईत स्थानिक व जिल्ह्यातील मिळून १४ जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक गीतांजली जगताप, आशिष शेलटकर, एस. पी. सुर्वे, ए. एस. गोसावी आदींचा सहभाग होता.
 

Web Title: Printout on gambling at Padwa, 14 vehicles including vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.