सिंधुदुर्ग : वैभववाडी बाजारपेठेत वाढणाऱ्या टपऱ्यांवरुन विरोधक आक्रमक, नगराध्यक्षांना विचारला जाब; शाब्दिक खटके; कारवाईचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 07:10 PM2018-01-17T19:10:29+5:302018-01-17T19:16:00+5:30

वैभववाडी बाजारपेठेतील सार्वजनिक जागांवर टपऱ्यांचे अतिक्रमण वाढीस लागले आहे. वाढत्या टपऱ्यांच्या संख्येमुळे बाजारपेठेला बकालपणा येऊ लागल्याबद्दल सोमवारी विरोधी पक्षांचे काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना जाब विचारला. त्यावेळी लवकरच विशेष सभा घेऊन टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष चव्हाण यांनी दिले. यावेळी नगराध्यक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खटके उडाले.

 Opponent aggressive toppers, Vaibhavwadi market: Nagar president asks for action; Verbal abuse; Assurance of action | सिंधुदुर्ग : वैभववाडी बाजारपेठेत वाढणाऱ्या टपऱ्यांवरुन विरोधक आक्रमक, नगराध्यक्षांना विचारला जाब; शाब्दिक खटके; कारवाईचे आश्वासन

वैभववाडी बाजारपेठेतील सार्वजनिक जागांवरील टपऱ्यांची वाढती संख्या आणि शहरातील प्रश्नांवर शिवसेना, भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना जाब विचारला.

Next
ठळक मुद्देवाढत्या टपऱ्यांच्या संख्येमुळे वैभववाडी बाजारपेठेला बकालपणा नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना विरोधी पक्षांचे काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब पथदिव्यांचे काम अर्धवट का?, तुमच्यामुळे आमची बदनामी होतेय नगराध्यक्ष आणि विरोधकांमध्ये उडाले जोरदार शाब्दिक खटके

वैभववाडी : बाजारपेठेतील सार्वजनिक जागांवर टपऱ्यांचे अतिक्रमण वाढीस लागले आहे. वाढत्या टपऱ्यांच्या संख्येमुळे बाजारपेठेला बकालपणा येऊ लागल्याबद्दल सोमवारी विरोधी पक्षांचे काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना जाब विचारला. त्यावेळी लवकरच विशेष सभा घेऊन टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष चव्हाण यांनी दिले. यावेळी नगराध्यक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खटके उडाले.

वैभववाडी बाजारपेठेतील दत्तमंदिर परिसर आणि दुर्गामाता उत्सव साजरा होणाऱ्या शासकीय भूखंडावर गेल्या तीन महिन्यांत टपऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बाजारपेठेत वाढणारी टपऱ्यांची संख्या हा शहरातील चर्चेचा विषय बनला. 

सोमवारी शिवसेनेचे नगरसेवक संतोष पवार, रोहन रावराणे, भाजपचे शहराध्यक्ष रणजित तावडे, नगरसेवक संतोष माईणकर, रत्नाकर कदम यांनी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना जाब विचारला. यावेळी शिवाजी राणे, अमित भागवत, बारक्या निकम, अजय मोहिते उपस्थित होते.

समोरच टपऱ्यांची संख्या वाढत असताना नगरपंचायतीचे त्याकडे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित करीत कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक भूखंडावरुन उचलून नगरपंचायतीच्या आवारात आणलेला स्टॉल दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच जागी लागतो कसा? अशी विचारणा तावडे, रावराणे व पवार यांनी केली.

अशा पद्धतीने सार्वजनिक जागा टपऱ्यांनी अडविल्या जाणार असतील तर भविष्यात बाजारपेठेचे चित्र कसे असेल असा प्रश्नही नगराध्यक्षांना केला. त्यावेळी नगराध्यक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खटके उडाले.

तुमची तक्रार असेल तर लेखी द्या; बाजारपेठेतील सगळ्याच टपऱ्या काढून टाकू, असे नगराध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. त्यावेळी ग्रामपंचायत काळातील टपऱ्या न हटवता त्यांचे योग्य पुनर्वसन करा; मात्र नव्याने लागलेल्या टपऱ्या काही लोक भाड्याने चालवत आहेत. त्यामुळे दत्तमंदिर परिसर आणि शासकीय भूखंडातील टपऱ्या तातडीने काढून टाकण्याची मागणी विरोधकांनी केली.

त्यावेळी नगराध्यक्ष चव्हाण यांनी प्रभारी मुख्याधिकारी देवानंद डेकळे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर लवकरच नगरपंचायतीची विशेष सभा घेऊन टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

पथदिव्यांचे काम अर्धवट का?

वैभववाडी शहरातील तावडेवाडी येथील पथदिव्यांचे काम मी रोखले अशी सर्वत्र बोंब मारली गेली. परंतु, ते कोणी आणि का थांबविले? याची तुम्ही चौकशी केलीत का? अशी विचारणा नगराध्यक्षांना करीत पथदिव्यांचे काम अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप रणजित तावडे यांनी केला.

तावडेवाडीतील पथदिव्यांचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानासुद्धा ठेकेदाराला नगरपंचायतीने पूर्णत्वाचा दाखला दिला याचा अर्थ जनतेने काय काढायचा? असा प्रश्नही तावडे यांनी नगराध्यक्ष चव्हाण यांना विचारला.

तुमच्यामुळे आमची बदनामी होतेय

बाजारपेठेत टपऱ्या लागतात. त्या टपऱ्यावर कारवाई न करण्यासाठी नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि सर्व नगरसेवक हजारो रुपये घेतात, अशी शहरात बोंब ऐकायला मिळते, असा आरोप करीत टपऱ्यांबाबतच्या तुमच्या कचखाऊ धोरणामुळे आमची जनतेत नाहक बदनामी होत आहे. आम्ही ती का सहन करायची? असा रोखठोक सवाल नगरसेवक संतोष पवार, रोहन रावराणे व संतोष माईणकर यांनी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना केला.
 

Web Title:  Opponent aggressive toppers, Vaibhavwadi market: Nagar president asks for action; Verbal abuse; Assurance of action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.