आगामी निवडणुकीत जुमलेबाज सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 27, 2023 04:36 PM2023-10-27T16:36:42+5:302023-10-27T16:46:00+5:30

जुमलेबाजीमुळेच त्यांना भीती वाटू लागली 

In the upcoming elections we will correct the program of the Jumlebaz government, Supriya Sule will attack the Modi government | आगामी निवडणुकीत जुमलेबाज सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

आगामी निवडणुकीत जुमलेबाज सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. त्याच महाराष्ट्राची मी एक स्वाभिमानी मुलगी आहे. परिणामी मराठी माणसांवर दिल्लीच्या बादशहाने कितीही अन्याय केला तरी हा महाराष्ट्र कधीही त्याच्यासमोर झुकला नाही आणि पुढे झुकणारही नाही. त्यामुळे ही मराठी अस्मिता वाचवण्यासाठी हा लढा लढू आणि आगामी निवडणुकीत त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला हल्लाबोल चढवला. 

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ नेते सुरेश दळवी, कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, पक्षनिरीक्षक शेखर माने, महिला अध्यक्षा रेवती राणे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस ,दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर आदी उपस्थित होते. 

मोदींनीच राष्ट्रवादी भ्रष्टाचारी नसल्याचे सिद्ध केले

यावेळी बोलताना खासदार सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपावर जोरदार हल्ला चढविला. देशाच्या पंतप्रधानांनी राष्ट्रवादीला नॅचरल करप्ट पार्टी म्हणजेच भ्रष्टाचारी पार्टी म्हणून हिणवले. पण त्याच मोदींना काहीच दिवसात याच पार्टीतील लोकांना सत्तेत सोबत घ्यावे लागले. यावरून जुमलेबाज मोदींनीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करप्ट पार्टी नसल्याचे सिद्ध केले.

जुमलेबाजीमुळेच त्यांना भीती वाटू लागली 

भाजपचेच सरकार हे भ्रष्ट आणि जुमलेबाज सरकार आहे. या जुमलेबाजीमुळेच त्यांना आता भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यासाठी प्रयत्न केले गेले. यांना मराठी माणूस मोठा झालेला नको आहे. बाळासाहेबांच्या पक्षाचं काय केलं? शरद पवारांच्या पक्षाचं काय केलं? दिल्लीत नितीन गडकरींच काय केलं? महाराष्ट्रात १०५ जण असताना देवेंद्र फडणविसांना उपमुख्यमंत्री केलं? आणि आणखीन एक उपमुख्यमंत्री आणून त्यांचं महत्वही कमी केलं. ही सगळी मराठी माणसंच आहेत‌. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे आणि त्यामागे दिल्लीची अदृष्य शक्ती कार्यरत आहे. त्यामुळे मराठी अस्मिता वाचवायची असेल तर या जुमलेबाज सरकारविरोधात लढा द्यावा लागेल आणि तो आम्ही लढू आणि जिंकूनही दाखवू असा विश्वासही व्यक्त केला.

Web Title: In the upcoming elections we will correct the program of the Jumlebaz government, Supriya Sule will attack the Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.