सावंतवाडीत जिल्हा संपर्क प्रमुखाकडून पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

By अनंत खं.जाधव | Published: November 22, 2023 04:05 PM2023-11-22T16:05:01+5:302023-11-22T16:07:04+5:30

"आपापसातील वाद मिटवा; केसरकरांचे अपयश सर्वांसमोर मांडा"

In Sawantwadi, the District Liaison Chief gave a shout out to the office bearers | सावंतवाडीत जिल्हा संपर्क प्रमुखाकडून पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

सावंतवाडीत जिल्हा संपर्क प्रमुखाकडून पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

सावंतवाडीसावंतवाडी तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटात आलेली मरगळ आणि गटातटाचे होत असलेले राजकारण त्यातच वरिष्ठांकडून झालेले दुर्लक्ष या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हा सर्पक प्रमुख अरूण दुधवडकर यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.आपापसातील वाद मिटवा आणि जोमाने कामला लागला दीपक केसरकर चौथ्यांदा आमदार होणार नाही.यासाठी गावागावात जावा केसरकराचे अपयश सर्वासमोर ठेवा अशी सुचना ही यावेळी केली.

शिवसेना ठाकरे गटाची बैठक मंगळवारी रात्रीउशिरा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये पार पडली. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या जान्हवी सावंत जिल्हाप्रमुख संजय पडते जिल्हा समन्वयक बाळा गावडे, तालुका प्रमुख रुपेश राऊळ वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत परब युवासेना जिल्हाप्रमुख सागर नाणोसकर अशोक परब संदीप पांढरे माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर राजु शेटकर गुणाजी गावडे मायकल डिसोजा उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार संदीप माळकर आबा केरकर आबा सावंत आदीसह सावंतवाडी तालुका आणि वेंगुर्ला तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी दुधवडकर यांनी मंत्री म्हणून दीपक केसरकर यांनी केलेल्या अनेक घोषणा फोल ठरल्या, फसव्या ठरल्या केसरकर यांनी एकही विकासात्मक काम अद्यापही मतदारसंघांमध्ये पूर्ण केलेले नाही तरी ते चौथ्यांदा पुन्हा निवडणुक रिंगणात उतरणार आहेत शिंदे गटांमध्ये केसरकर गेले असले तरी त्याचा कोणताही फरक उद्धव ठाकरे शिवसेनेला पडलेला नाही एकही कार्यकर्ता त्यांच्यासोबत गेलेला नाही. हे आपले यश असून संघटन पातळीवर चांगले काम सुरू आहे.मात्र आता आपापसातील मतभेद मिटवा संघटना वाढवताना गटतट नको ऐकामेकाला विश्वासात घेऊनच काम करा अशा सुचना यावेळी दिल्या.

कासार यांच्या घरी खळा बैठक

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून  23 नोव्हेंबरला दुपारी सव्वा बारा वाजता उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार याच्या माजगाव येथील घराच्या अंगणात खळा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: In Sawantwadi, the District Liaison Chief gave a shout out to the office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.