जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सन्मान : महेश सावंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 04:03 PM2018-07-02T16:03:51+5:302018-07-02T16:06:47+5:30

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ,मिरज यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पखवाज वादन परीक्षेत श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या कणकवली शाखेतील विद्यार्थ्यानी यश मिळविले आहे. या विद्यार्थ्यांना शिवसेना कणकवली उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर यांच्या हस्ते गुणपत्रके देऊन कणकवली येथील कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

Honors for students of Jagannath Sangeet Vidyalaya: Mahesh Sawant | जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सन्मान : महेश सावंत 

कणकवली येथील श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या पखवाज वादन परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमोद मसुरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पखवाज अलंकार महेश सावंत उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देजगन्नाथ संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सन्मानगुणवंत पखवाज वादक घडविण्यावर भर !

कणकवली : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ,मिरज यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पखवाज वादन परीक्षेत श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या कणकवली शाखेतील विद्यार्थ्यानी यश मिळविले आहे. या विद्यार्थ्यांना शिवसेना कणकवली उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर यांच्या हस्ते गुणपत्रके देऊन कणकवली येथील कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले .

कुडाळ आंदुर्ले येथील पखवाज अलंकार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली येथे श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या शाखेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी पखवाज वादनाचे धड़े गिरवित आहेत. या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यानी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ,मिरज यांच्या वतीने घेण्यात आलेली पखवाज वादन परीक्षा दिली होती. या विद्यार्थ्यानी सुयश मिळविले आहे.

यामध्ये प्रवेशिका प्रथम परीक्षा उत्तीर्ण : साहिल परेश सावंत (जानवली),कृष्णा महेंद्र ताटे (वागदे),तातोबा प्रकाश चव्हाण (ओसरगाव) , राहुल श्रीधर येंडे (बोर्डवे),यश श्यामसुंदर जाधव (साकेडी), प्रशांत प्रकाश घाडीगांवकर (आशिये मठ), चैतन्य किशोर आरेकर (हरकुळ, बुद्रुक),सोहम उमेश वायंगणकर (हुंबरठ) धनंजय संतोष चव्हाण (करंजे)तसेच प्रवेशिका पूर्ण परीक्षा उत्तीर्ण चिन्मय अशोक मुरकर (जानवली) यांचा समावेश आहे.

या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी ते विशेष योग्यता श्रेणी प्राप्त केली आहे .या सर्व विद्यार्थ्यांना पखवाज अलंकार महेश सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. जगन्नाथ संगीत विद्यालयाचे संचालक पखवाज उस्ताद डॉ.दादा परब तसेच भजन सम्राट बुवा भालचंद्र केळुसकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

गुणवंत पखवाज वादक घडविण्यावर भर !

पखवाज वादन कला आत्मसात करताना मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या अडचणींवर मात करीत पखवाज अलंकार हा बहुमान मी संपादन केला आहे. मला अवगत असलेली कला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवोदित पखवाज वादकांच्या उपयोगी पडावी आणि त्यातून गुणवंत पखवाज वादक घडावेत यावर माझा अधिक भर आहे.

मला करावे लागलेले कष्ट या नवोदित पखवाज वादकाना करावे लागू नयेत यासाठी माझे प्रयत्न असून त्यासाठी सिंधुदुर्गात ठिकठिकाणी जावून आपण पखवाज वादनाचे धड़े विद्यार्थ्यांना देत आहे. त्याचा या विद्यार्थ्यानी लाभ घ्यावा व आपले भविष्य उज्वल करावे. असे आवाहन यावेळी महेश सावंत यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

 

Web Title: Honors for students of Jagannath Sangeet Vidyalaya: Mahesh Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.