गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करा, चंद्रकांत पाटलांची अधिकाऱ्यांना सक्त ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 02:16 AM2018-08-11T02:16:53+5:302018-08-11T02:17:41+5:30

मुंबईतील बहुसंख्य कोकणवासीयांना गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचाच प्रामुख्याने वापर करावा लागतो.

Before the Ganeshotsav, take away the Mumbai-Goa highway, warns Chandrakant Patil officials | गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करा, चंद्रकांत पाटलांची अधिकाऱ्यांना सक्त ताकीद

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करा, चंद्रकांत पाटलांची अधिकाऱ्यांना सक्त ताकीद

Next

सावंतवाडी : मुंबईतील बहुसंख्य कोकणवासीयांना गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचाच प्रामुख्याने वापर करावा लागतो. त्यामुळे या महामार्गावर वाढणारा वाहतुकीचा अतिरिक्त ताण विचारात घेऊन गणेशोत्सवापूर्वीच हा महामार्ग वाहतुकीसाठी खड्डेमुक्त करण्यात यावा, अन्यथा, संबंधित अधिकारी वर्गावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सार्वजानिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारच्या बैठकीत दिला. तसेच पुढील वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे प्रलंबित काम पूर्ण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित भूसंपादन आणि चौपदरीकरणाच्या कामाचा आढावा मुंबई मंत्रालय येथील बैठकीत घेण्यात आला.या बैठकीला सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, *सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, सचिव (रस्ते) सी. पी. जोशी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे धनराज तावडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष कार्य अधिकारी सुधीर देऊळगावकर, रायगडचे जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे आदी उपस्थिती होते.सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांनी अपूर्ण कामाबाबत अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या. यापुढील काळात या महामार्गाच्या कामाचा वेग कमी झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. पाटील म्हणाले की, दरवर्षी गणपती उत्सवासाठी मुंबईस्थित अनेक चाकरमानी कोकणात गावी जात असतात. त्यामुळे प्रवासादरम्यान कोणताही त्रास होऊ नये, अपघात होऊ नये याकरिता मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच महामार्गाचे प्रलंबित भूसंपादन तातडीने पूर्ण करून चौपदरीकरणाचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे सुचना ही महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. पाली-खोपोली पर्यायी मार्गावरचे खड्डेही गणपतीपूर्वी भरून रस्ता वाहतुकीस सुयोग्य करावा. तसेच पेण-वडखळ बायपास रस्ताही खुला करावा.
त्याचप्रमाणे, या महामार्गावर गणेशोत्सव कालावधीत वाढणारा वाहतुकीचा अतिरिक्त ताण काही प्रमाणात कमी होण्याच्या दृष्टीने मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गे देखील प्रवास करण्यात येतो. त्यामुळे या महामार्गावरील टोल नाक्यांवर होणारी वाहतुकीची कोंडी विचारात घेऊन गतवर्षी प्रमाणेच या महामार्गावरून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यात, यावी अशी सुचना यावेळी शिदे यांनी केली आहे.

Web Title: Before the Ganeshotsav, take away the Mumbai-Goa highway, warns Chandrakant Patil officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.