दोडामार्ग पोलिसांनी दारुसह पकडला १ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:03 PM2021-06-01T16:03:26+5:302021-06-01T16:06:10+5:30

liquor ban Sindhudurg : दोडामार्ग पोलिसांनी आज अवैध होणाऱ्या दारुवाहतुकी विरुद्ध मोठी कारवाई केली.सेन्ट्रो कार (एम एच ०९ ए क्यू ७०५०) हिची झाडाझडती घेतली असता गोवा बनावटीच्या विविध ब्रॅण्ड ची सुमारे ६१५६०/- रुपये किमतीची दारू सापडून आली. याविरुद्ध कारवाई करताना गाडीसह १८६५६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Dodamarg police seized 1 lakh 86 thousand items along with liquor | दोडामार्ग पोलिसांनी दारुसह पकडला १ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल

दोडामार्ग पोलिसांनी दारुसह पकडला १ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल

Next
ठळक मुद्देदोडामार्ग पोलिसांनी दारुसह पकडला १ लाख ८६ हजाराचा मुद्देमालपेट्रोलींग दरम्यान करण्यात आली कारवाई

दोडामार्ग : दोडामार्ग पोलिसांनी आज अवैध होणाऱ्या दारुवाहतुकी विरुद्ध मोठी कारवाई केली. पोलीस पेट्रोलिंग दरम्यान आधीच गोपनीय माहिती मिळाल्या प्रमाणे सेन्ट्रो कार (एम एच ०९ ए क्यू ७०५०) हिची झाडाझडती घेतली असता गोवा बनावटीच्या विविध ब्रॅण्ड ची सुमारे ६१५६०/- रुपये किमतीची दारू सापडून आली. याविरुद्ध कारवाई करताना गाडीसह १८६५६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या दारुवाहतुक प्रकरणी तुकाराम वैजू सुपल (२७) रा. तुर्केवाडी चंदगड व वैभव विठोबा चव्हाण (२७) रा. कुरकुंडी, चंदगड  यांना अटक करून त्यांच्यावर र. न. ७८/२०२१ कलम महा. दारूबंदी अधि. कलम ६५ (अ) (ई).८१.८३ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Web Title: Dodamarg police seized 1 lakh 86 thousand items along with liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.