स्वतंत्र कोकण विद्यापीठाची मागणी : महेंद्र नाटेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 03:44 PM2017-09-28T15:44:13+5:302017-09-28T15:48:30+5:30

कोकणी माणूस बुद्धिमान आणि प्रतिभाशाली असतानाही केवळ पुरेशी शैक्षणिक सुविधा न मिळाल्याने कोकणची पिछेहाट होत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांसाठी ‘स्वतंत्र कोकण विद्यापीठ’ व्हावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. 

Demand for independent Konkan University: Mahendra Natate | स्वतंत्र कोकण विद्यापीठाची मागणी : महेंद्र नाटेकर

स्वतंत्र कोकण विद्यापीठाची मागणी : महेंद्र नाटेकर

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदनकोकण विद्यापीठ जगात आघाडीवर राहील : प्रा. नाटेकर लोकप्रतिनिधी उदासीनशिक्षणमंत्र्यांनी लक्ष न दिल्याने कोकणी मुलांचे भवितव्य धोक्यात

 सिंधुदुर्गनगरी : कोकणी माणूस बुद्धिमान आणि प्रतिभाशाली असतानाही केवळ पुरेशी शैक्षणिक सुविधा न मिळाल्याने कोकणची पिछेहाट होत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांसाठी ‘स्वतंत्र कोकण विद्यापीठ’ व्हावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.  तसेच हे विद्यापीठ झाल्यास जगातील पहिल्या दोनशे विद्यापीठांच्या क्रमांकात कोकण विद्यापीठ आघाडीवर असेल, अशा विश्वास स्वतंत्र कोकण संघटनेचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.


स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या मागणीबाबत येथील पत्रकार कक्षात स्वतंत्र कोकण संघटनेचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रा. कृष्णा दळवी, प्रा. गजानन परूळेकर, प्रा. शांताराम राणे, प्रा. श्रीपाद परब आदी उपस्थित होते. 


यावेळी प्रा. नाटेकर म्हणाले की, कोकणात स्वतंत्र विद्यापीठ नसल्याने येथील विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठावर अवलंबून रहावे लागते. मात्र या विद्यापीठात संपूर्ण देशातून विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे हे विद्यापीठ भारतीय विद्यापीठ झाले आहे. या विद्यापीठात प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या अनेकपटीने वाढली आहे. त्यामुळे या विद्यापीठाचे प्रशासन कोलमडू लागले आहे. याशिवाय आता या विद्यापीठाच्या करभारात सावळागोंधळ निर्माण झाला आहे.


सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोकणात वनस्पती, वनौषधी, खनिजे आणि जैवविविधता आहे. त्यामुळे येथे संशोधनाला भरपूर वाव आहे. मात्र मुंबई विद्यापीठाने अद्यापपर्यंत त्यादृष्टीने कोणतीही पावले उचलली नाहीत. मुंबई विद्यापीठाच्या कारभारातील गोंधळ पाहता त्यात सुधारणा झाली तरी कोकणच्या बहुसंख्य समस्या कायम राहणार आहेत. त्यामुळे कोकणचा विचार करता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांसाठी रत्नागिरी या मध्यवर्ती ठिकाणी ‘स्वतंत्र कोकण विद्यापीठ’ व्हावे अशी मागणी स्वतंत्र कोकण संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती प्रा. महेंद्र नाटेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  मागणी मान्य न झाल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

कोकण विद्यापीठ जगात आघाडीवर राहील : प्रा. नाटेकर 


जगातील पहिल्या दोनशे विद्यापीठांच्या गणनेत  भारतातील एकाही विद्यापीठाची गणना होत नाही. ही शरमेची बाब आहे. मात्र दहावी आणि बारावीचा स्वतंत्र कोकण बोर्ड निर्माण झाल्यापासून हा बोर्ड राज्यात आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे स्वतंत्र कोकण विद्यापीठ मंजूर झाल्यास हे विद्यापीठ जगातील दोनशे विद्यापीठांच्या गणनेत आघाडीवर राहील, असा विश्वास प्रा. महेंद्र नाटेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

लोकप्रतिनिधी उदासीन


कोकणी माणूस अत्यंत बुद्धिमान आणि प्रभावशाली असतानाही केवळ अपुºया शैक्षणिक सुविधांमुळे मागे रहात आहे. त्यासाठी कोकणाला विविध सुविधांसह स्वतंत्र कोकण विद्यापीठ होणे आवश्यक आहे. मात्र आजपर्यंत या मागणीकडे जिल्ह्यासह कोकणातील लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केला असल्याचा आरोपही प्रा. नाटेकर यांनी यावेळी केला आहे. 


शिक्षणमंत्र्यांनी लक्ष न दिल्याने कोकणी मुलांचे भवितव्य धोक्यात


अपुºया शैक्षणिक सुविधांमुळे कोकणी मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र त्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. शिक्षणमंत्री हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याने ते कोकणाकडे लक्ष देतील अशी आशा होती. मात्र त्यांनीही कोकणातील विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केला आहे. या दुर्लक्षामुळे कोकणी मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात असल्याचेही स्वतंत्र कोकण संघटनेचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी यावेळी सांगितले.
 

Web Title: Demand for independent Konkan University: Mahendra Natate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.