कणकवली नजीक जानवली नदीपुलाजवळ कंटेनर उलटला; चालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 01:22 PM2021-08-02T13:22:32+5:302021-08-02T13:26:20+5:30

Accident Kankvali Sindhudurg : गोव्याहून पनवेलच्या दिशेने जाणारा कंटेनर कणकवली शहरालगत जानवली नदीपुलानजीक उलटी होऊन झालेल्या अपघातात कंटेनर चालक जागीच ठार झाला आहे. महेंद्र रघुनाथ भोसले (वय ४५ रा. बीभळी, ता.फलटण, सातारा ) असे मृत चालकाचे नाव आहे.

Container overturned near Janwali river bridge near Kankavali; The driver was killed on the spot | कणकवली नजीक जानवली नदीपुलाजवळ कंटेनर उलटला; चालक जागीच ठार

कणकवली नजीक जानवली नदीपुलाजवळ कंटेनर उलटला; चालक जागीच ठार

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवली नजीक जानवली नदीपुलाजवळ कंटेनर उलटलाकंटेनरवरील नियंत्रण सुटले, चालक जागीच ठार

कणकवली : गोव्याहून पनवेलच्या दिशेने जाणारा कंटेनर कणकवली शहरालगत जानवली नदीपुलानजीक उलटी होऊन झालेल्या अपघातात कंटेनर चालक जागीच ठार झाला आहे. महेंद्र रघुनाथ भोसले (वय ४५ रा. बीभळी, ता.फलटण, सातारा ) असे मृत चालकाचे नाव आहे.

चालकाचे अचानक कंटेनरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मुंबई- गोवा महामार्गावरील रस्ता दुभाजकावर कंटेनर चढला आणि उलटला. त्याचवेळी चालकाने कंटेनर मधून उडी मारली. मात्र, पलटलेल्या कंटेनरखाली चालक महेंद्र भोसले सापडला आणि ठार झाला.

सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातस्थळी वाहतूक पोलीस संदेश अबीटकर, वैभव कोळी , पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे यांनी तत्काळ धाव घेतली. तसेच घटनास्थळाची पहाणी करून पंचनामा केला. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.


 

Web Title: Container overturned near Janwali river bridge near Kankavali; The driver was killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.