इन्सुलीतील बेपत्ता महिलेचा मृतदेह तेरेखोल नदीपात्रात आढळला

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 26, 2023 11:24 AM2023-08-26T11:24:30+5:302023-08-26T11:25:02+5:30

बांदा पोलिसात फिर्याद दाखल केली होती. 

body of a missing woman from insuli was found in the terekhol river | इन्सुलीतील बेपत्ता महिलेचा मृतदेह तेरेखोल नदीपात्रात आढळला

इन्सुलीतील बेपत्ता महिलेचा मृतदेह तेरेखोल नदीपात्रात आढळला

googlenewsNext

महेश सरनाईक, बांदा (सिंधुदुर्ग ):  इन्सुली – गावडेवाडी येथील बेपत्ता महिला रुक्मिणी नारायण गावडे (४७) यांचा मृतदेह शनिवारी सकाळी तेरेखोल नदीत तुळसाण पुलानजीक आढळून आला. त्या गुरुवार संध्याकाळ पासून बेपत्ता होत्या. नातलगांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध करुनही आढळून न आल्याने काल सायंकाळी बांदा पोलिसात फिर्याद दाखल केली होती. 

अखेर आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. बांदा पोलिस उपनिरीक्षक समीर भोसले, काँस्टेबल सिताकांत नाईक, नरेंद्र कुडतरकर आदींसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला आहे. इन्सुली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.

Web Title: body of a missing woman from insuli was found in the terekhol river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.