देवगड पवनचक्की परिसरात अग्नीतांडव, ५0 एकर गवत जळाले : सुदैवाने कलमबागा बचावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 03:38 PM2017-12-05T15:38:09+5:302017-12-05T15:39:32+5:30

देवगड पवनचक्की परिसरात झालेल्या अग्नीतांडवामध्ये सुमारे ५० एकर जागेतील गवत जळून गेले. सुदैवाने आसपासच्या कलमबागांना आगीची झळ न बसल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. देवगड पवनचक्की परिसरातील सितबावच्या काठीनजीक असलेल्या जागेतील गवताला सोमवारी आग लागली.

Agnathandav, 50 acres of grass burnt in Devgad Pawan Chakki area: Luckily Rescue of Kalambag | देवगड पवनचक्की परिसरात अग्नीतांडव, ५0 एकर गवत जळाले : सुदैवाने कलमबागा बचावल्या

देवगड पवनचक्की परिसरात गवताला आग लागून गवत बेचिराख झाले. (छाया : वैभव केळकर)

Next
ठळक मुद्देअग्नीतांडवामध्ये सुमारे ५० एकर जागेतील गवत जळून गेलेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आसपासच्या कलमबागांना आगीची झळ न बसल्याने मोठा अनर्थ टळला

देवगड : देवगड पवनचक्की परिसरात झालेल्या अग्नीतांडवामध्ये सुमारे ५० एकर जागेतील गवत जळून गेले. सुदैवाने आसपासच्या कलमबागांना आगीची झळ न बसल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना सोमवारी सकाळी घडली.


देवगड पवनचक्की परिसरातील सितबावच्या काठीनजीक असलेल्या जागेतील गवताला सोमवारी आग लागली. सोसाट्याचा वारा असल्यामुळे आग फैलावली व पवनचक्की परिसरातील ५० एकर जागेतील गवत आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.


आग लागल्याचे समजताच सुझलॉन कंपनी कार्यालयातील कर्मचारी, दादा जोईल, हेमंत जोईल, राज साटम, सर्वेश मुंबरकर, स्मिता जोईल, अर्चना साटम आदी पवनचक्की आझादनगर परिसरातील ग्रामस्थ, देवगडमधील काही नागरिक व आसपासच्या बागांचे मालक व त्यांचे कामगार यांनी आग आटोक्यात आणण्याचे आटोकाट प्रयत्न केले. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. या आगीत गवत जळून गेले. मात्र आसपासच्या बागांना कोणतीही झळ न बसल्याने मोठा अनर्थ टळला.


आग लागल्याची माहिती समजताच उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, नगरसेवक बापू जुवाटकर, नगरसेविका साक्षी वातकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरपंचायतीच्या कर्मचाºयांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

 

Web Title: Agnathandav, 50 acres of grass burnt in Devgad Pawan Chakki area: Luckily Rescue of Kalambag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.