एका विद्यार्थिनीसाठी कुटुंब सोडून अध्ययन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 11:32 PM2019-01-27T23:32:51+5:302019-01-27T23:32:56+5:30

प्रगती जाधव-पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कात्रेवाडी, जुंगटी, तांबी, पिसाडी या गावांची नावं फारशी ऐकिवात नाहीत. जंगली ...

Study leaving the family for a student | एका विद्यार्थिनीसाठी कुटुंब सोडून अध्ययन

एका विद्यार्थिनीसाठी कुटुंब सोडून अध्ययन

Next

प्रगती जाधव-पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कात्रेवाडी, जुंगटी, तांबी, पिसाडी या गावांची नावं फारशी ऐकिवात नाहीत. जंगली श्वापदाने हल्ला केला तरच त्याच्या बातमीत या व अशा दुर्गम-डोंगरी भागातील गावांची नावं वाचायला मिळतात. एरवी या गावांची बातमी होण्याची सूतरामही शक्यता नाही. ही गावं आहेतच तशी! अशा कात्रेवाडीत जिल्हा परिषदेच्या शाळेवर एका शिक्षकाची नेमणूक आहे, पाचवीत शिकणाऱ्या एकमेव विद्यार्थिनीला शिकविण्यासाठी!
साताºयाच्या पश्चिमेकडील डोंगर रांगेत, कासपासून वजराई धबधब्याकडे गाडी वळते. जुंगटीपर्यंत चारचाकी जाते. तेथून थोडं पुढे, काही अंतरापर्यंत जंगलातील मळलेल्या पायवाटेने मोटारसायकल नेता येते. एका झाडाखाली मोटारसायकल उभी करून कात्रेवाडीच्या दिशेने डोंगर उताराने त्यांचा पायी प्रवास सुरू
होतो.
कात्रेवाडी म्हणजे साधारण १०-१५ घरांची वस्ती. सध्या वस्तीवर सहा-सात कुटुंब राहत. एकूण माणसांची संख्या अवघी २०! गावात जिल्हा परिषदेने बांधलेली शाळा आहे. तेवढीच काय ती पक्की इमारत, बाकी सगळी घरं कच्चीच, कुडाची. या शाळेत पाचवी इयत्तेत शिक्षण घेत असलेली वर्षा दिलीप मगराजे ही या वर्गातील आणि शाळेतीलही एकमेव विद्यार्थिनी! तिच्यासाठी एका शिक्षकाची नेमणूक आहे. शाळा उघडणे, वर्गखोलीची झाडलोट, शालेय पोषण आहार तयार करणे आदी कामे शिक्षकालाच करावी लागतात. त्यामुळे या शाळेसाठी शिपाईही तेच आणि गुरुजीही तेच आहेत.
हा शिक्षक फलटण तालुक्यातून बदलून येथे आला. गवे, अस्वले, धुकं या गोष्टी त्यांनी पुस्तकांतून वाचल्या-ऐकल्या. गहू हे एकमेव पीक स्थानिक शेतकरी घेतात. गव्यांच्या उपद्रवाने फारसे पीक हाती लागत नाही. दत्तराम साळुंखे यांच्या घरी गुरुजींचा मुक्कामी असतात. सोमवारी कात्रेवाडीला जाताना गुरुजीसोबत पालेभाज्या घेऊन जातात. ‘इथले लोक इतक्या अडचणीत जीवन जगत आहेत. त्यांच्या त्रासापुढे आपली गैरसोय काहीच नाही,’ असे गुरुजी देतात.
कुटुंबाबरोबर संपर्कासाठी टेकडीची चढाई
काही वर्षांपूर्वी या वस्तीवर वीज पोहोचली. पावसाळ्यात वादळीवारा किंवा यांत्रिक बिघाडाने वीज गेली तर आठवडा अंधारात काढावा लागतो, अशी येथील स्थिती आहे. मोबाईलला रेंज मिळवायसाठी वस्तीच्या उशाशी असलेली टेकडी चढून जावे लागते. पत्नीसह गुरुजींची दोन मुले गावी फलटणला असतात. घरात कोणाला दुखले-खुपले, अडीअडचणीच्या वेळी कुटुंबाशी संपर्क करायचा झाल्यास गुरुजी मोबाईल घेऊन टेकडीवर येण्याची वाट पाहावी लागते. जोपर्यंत गुरुजी ठरवत नाहीत, तोवर त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना संपर्क करण्याचा काहीच मार्ग नाही!
मुराळी कायम हवाच!
दुर्गम भागात शाळा असल्याने दळण-वळणाच्या साधनांची वानवा. त्यामुळे कात्रेवाडीत, एकाच्या घरी शिक्षक मुक्कामी राहतात. शनिवारी शाळा सुटल्यानंतर गावी जायचे, सोमवारी सकाळी पुन्हा शाळेवर यायचे, हा शिक्षकांचा क्रम. कात्रेवाडीत जाता-येताना, वाट तुडवताना श्वापदांच्या भीतीने त्यांना कायम सोबतीला स्थानिक कोणाला तरी घ्यावे लागते. शनिवारीच गुरुजी केव्हा येणार याचे नियोजन ठरते. ठरलेल्या वेळेत नियोजित ठिकाणी ग्रामस्थ मुराळी म्हणून शिक्षकाची वाट पाहत उभे असतात.

Web Title: Study leaving the family for a student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.