सामाजिक बांधिलकी फलकावर झळकली

By admin | Published: October 12, 2015 09:01 PM2015-10-12T21:01:31+5:302015-10-13T00:13:35+5:30

खंडाळा ग्रामपंचायतीचा उपक्रम : काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन

Social commitment reflected on the panel | सामाजिक बांधिलकी फलकावर झळकली

सामाजिक बांधिलकी फलकावर झळकली

Next

खंडाळा : ‘पाणी हे जीवन आहे,’ त्यामुळे पाण्याचा गरजेपुरता आणि काटकसरीने वापर केला पाहिजे. हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. विशेषत: यावर्षी गावोगावी दृष्काळसदृश परिस्थिती असल्याने पाण्याचे महत्त्व समजू लागले आहे. पाण्याच्या वापराबाबत लोकांमध्ये जागृती व्हावी, यासाठी खंडाळा ग्रामपंचायतीने शहरातील चौकाचौकांमध्ये फलकाद्वारे जनप्रबोधन करण्याची नामीयुक्ती वापरली आहे. त्यामुळे एरव्ही कार्यक्रम वाढदिवसाचे फलक झळकणाऱ्या जागी पाणी वापराच्या सूचना देणारे फलक ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत आहे.
यावर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे भूजल पातळी खालावली आहे. सर्वत्र दुष्काळाची चिन्हे जाणवू लागली आहेत. त्यामुळे काही गावांतून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे पाणीचा योग्य वापर गरजेनुसार व काटकसरीने होणे आवश्यक
आहे; परंतु हे लोकापर्यंत पोहोचविणे तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी खंडाळा ग्रामपंचायतींनी
शहरातील प्रत्येक चौकात ‘काटकसरीने पाणी वापरा’ अशा आशयाचे फलक लावले
आहेत. जाता येता हे फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. आपोपच लोकांचे प्रबोधन होत आहे. वाढदिवसाचे फलक लावण्यापेक्षा जनजागृतीसाठी हा मार्ग चांगला असल्याचे ग्रामस्थांमध्येच चर्चा
आहे. (प्रतिनिधी)

‘पाणी जपून वापरा’ हे तोंडी किती जणांना सांगणार? यासाठी ग्रामपंचायतीने निर्णय घेऊन फलक लावले आहेत. त्याचा प्रभाव जाणवत आहे. लोकांनी यापुढील काळात पाण्याचा दक्षतेने वापर करावा.
- सुरेश गाढवे,
उपसरपंच खंडाळा

Web Title: Social commitment reflected on the panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.