सिद्धेश पै साताऱ्यात

By admin | Published: December 18, 2014 09:19 PM2014-12-18T21:19:27+5:302014-12-19T00:25:02+5:30

दोन जानेवारीपासून देणार नृत्याचे धडे

Siddhesh Paa Satara | सिद्धेश पै साताऱ्यात

सिद्धेश पै साताऱ्यात

Next

सातारा : पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमीने नृत्य कार्यशाळा आयोजित केली आहे. यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसून साडेतीन वर्षांच्या पुढील व्यक्ती या कार्यशाळेत सहभागी होऊन नृत्याचे प्रशिक्षण घेऊ शकतो.
पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमीने सातारकरांना एक व्यासपीठ मिळावे म्हणून नेहमीच वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नृत्यकलेला वाव मिळावा आणि या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे म्हणून दरवर्षी दिग्गज कलाकारांच्या भेटीला आणले आहे.
अ‍ॅकॅडमीच्य वर्धापनदिनानिमित्त वेगवेगळे कलाकार दरवर्षी साताऱ्यात येत असतात. या पार्श्वभूमीवर ‘डान्स इंडिया’ या नृत्य स्पर्धेच्या पहिल्या सिझनमध्ये इतर रनर ग्रुप ठरलेला आणि पुढच्या प्रत्येक सिझनमध्ये स्किपर (नृत्यप्रशिक्षक) असलेला लोकप्रिय सिद्धेश पै २ जानेवारी पासून पुढे सलग १० दिवस सातारकरांना नृत्याचे धडे देणार आहे.
२ जानेवारी ते ११ जानेवारी २०१५ या १० दिवसांच्या कालावधीत दुध संघ हॉल, सातारा कॅर्फे जवळ पोवई नाका सातारा येथे कार्यशाळा होणार आहे.
महिला व लहान मुलांच्या स्वतंत्र बॅचेस केल्या जाणार आहेत. अधिक माहितीसाठी पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमी कमानी हौदाजवळ सातारा. आणि ९७६४४०६४६४, ९९२२९१३३४५, या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

‘लोकमत’ सभासदांना लाभ
या कार्यशाळेचे माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ आहे. लोकमतच्या सखी मंच, बालविकास मंच, आणि युवानेक्स्ट च्या सभासदांसाठी प्रशिक्षण फी मध्ये ५००/- रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. प्रशिक्षण शुल्क इतरां करता २५००/- आणि लोकमतच्या सभासदांकरता २०००/- रूपये प्रवेश शुल्क घेतले जाणार आहे. कार्यशाळा संपल्यानंतर प्रसिध्द नृत्य प्रशिक्षक सिद्धेश पै सोबत स्टेज शोमध्ये नृत्य करण्याची संधी मिळणार आहे.

Web Title: Siddhesh Paa Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.