अजिंक्यतारा किल्ल्यावर जागला शिवजागर कल्पनाराजे भोसले : राजधानी महोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:58 PM2018-05-25T23:58:49+5:302018-05-25T23:58:49+5:30

‘सुमारे चारशे वर्षांपूर्वी युद्ध कला आणि युद्धनीती कशी होती, तसेच शिवकालीन शस्त्रे व खेळ कोणते होते, हे आज बहुतांशी व्यक्ती आणि युवकांना माहिती नाही.

 Shivajagara Kalanaraje Bhosale, started for the fort at Ajinkya Fort | अजिंक्यतारा किल्ल्यावर जागला शिवजागर कल्पनाराजे भोसले : राजधानी महोत्सवाला प्रारंभ

अजिंक्यतारा किल्ल्यावर जागला शिवजागर कल्पनाराजे भोसले : राजधानी महोत्सवाला प्रारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देशिवकालीन पोवाडे, मर्दानी खेळ, शिवकालीन शस्त्रांस्त्रांची प्रात्यक्षिके

सातारा : ‘सुमारे चारशे वर्षांपूर्वी युद्ध कला आणि युद्धनीती कशी होती, तसेच शिवकालीन शस्त्रे व खेळ कोणते होते, हे आज बहुतांशी व्यक्ती आणि युवकांना माहिती नाही. त्यामुळे राजधानी महोत्सवातील ‘शिवजागर’ या कार्यक्रमामधून शिवकालीन शस्त्रांस्त्रांचे प्रदर्शन व खेळांचे प्रात्यक्षिक दाखविण्याचा घेतलेला उपक्रम निश्चितच ऐतिहासिक काळात घेऊन जाणारा आहे.

किल्ले अजिंक्यतारा ही मराठा साम्राज्याची राजधानी होती. आपल्या पूर्वजांनी गाजवलेल्या पराक्रमामधून आणि जाज्वल्य इतिहासामधून बोध घेऊन आधुनिक संगणकीय युगात युवकांनी शिवनीती आचरणात आणून चौफेर प्रगती करावी,’ असे आवाहन राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी केले.

राजधानी सातारा महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या शिवजागर कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर आदींची उपस्थिती होती. ‘राजधानी महोत्सव’ हा सातारा जिल्हावासीयांचा महोत्सव आहे.

या महोत्सवाच्या उपक्रमातून युवकांसह सर्वांना जीवनाची प्रेरणा मिळावी म्हणून शिवजागरसह युवागिरी आणि सातारा गौरव पुरस्कारांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमांचा प्रत्येक सातारकर नागरिकांनी आणि महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही याप्रसंगी राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी केले.

यावेळी शिवकालीन पोवाडे मर्दानी खेळ तसेच शिवकालीन शस्त्रांस्त्रांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. सुमारे दोन ते अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमास उपस्थित आबालवृद्धांनी भरभरून दाद दिली. यावेळी संभाजी भिडे गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले. साताऱ्याचा बालकलाकार कुमार वीरेन पवार याने पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. नगराध्यक्षा माधवी कदम यांनी आभार मानले.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, सुनील सावंत, संदीप शिंदे, बाळासाहेब गोसावी, बांधकाम सभापती मनोज शेंडे, नगरसेवक दत्तात्रय बनकर, संजय शिंदे, संजय पाटील, किशोर शिंदे, राजू भोसले, बबलू साळुंखे, माजी नगराध्यक्षा व नगरसेविका स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, संग्राम बर्गे, काका धुमाळ, गणेश जाधव, आर. वाय. जाधव, अ‍ॅड. अंकुश जाधव, अ‍ॅड. विकास पवार, बाळासाहेब चोरगे, प्रताप शिंदे, सुनील बर्गे, शुभम ढोरे, हर्षल माने, सौरभ सुपेकर, राजू गोडसे, रवींद्र झुटिंग, गीतांजली कदम यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

युवकांसाठी दोन दिवस कार्यक्रम...
‘युवागिरी’ हा गीतसंगीताचा खास युवकांसाठी कार्यक्रम दि. २६ मे रोजी आयोजित केला असून, रविवार दि. २७ मे रोजी शिवसन्मान पुरस्कारासह, सातारा गौरव पुरस्काराचे वितरण व पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमीचा ‘स्टेपअप’ हा कार्यक्रम होणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम शाहू स्टेडियमवर सायंकाळी सहा वाजता होणार आहेत, या कार्यक्रमांना सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

साताºयातील किल्ले अजिंक्यतारावर शुक्रवारी राजधानी महोत्सावाला सुरुवात झाली. यावेळी निघालेल्या मिरवणुकीत खासदार उदयनराजे भोसले, संभाजी भिडे गुरुजी, सुनील काटकर, श्रीकांत आंबेकर सहभागी झाले.

Web Title:  Shivajagara Kalanaraje Bhosale, started for the fort at Ajinkya Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.