सातारा : मामाच्या गावी आलेली भाची नीरा कालव्यात वाहून गेली, शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 04:39 PM2018-04-21T16:39:37+5:302018-04-21T16:39:54+5:30

मामाच्या घरी सुटीसाठी आलेली अठरा वर्षीय युवती नीरा उजवा कालव्यात वाहून गेली. प्रियंका सुनील घोडके असे त्या युवतीचे नाव आहे. फलटण तालुक्यातील निंबळक या ठिकाणी शनिवारी सकाळी ही घटना घडली असून, वाहून गेलेल्या युवतीचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Satara: The niece of his uncle, who was born in the Narmada area, was carried away in the canal, the search started: the incident at Nimbalkar in Phaltan taluka. | सातारा : मामाच्या गावी आलेली भाची नीरा कालव्यात वाहून गेली, शोध सुरू

सातारा : मामाच्या गावी आलेली भाची नीरा कालव्यात वाहून गेली, शोध सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देमामाच्या गावी आलेली भाची नीरा कालव्यात वाहून गेली, शोध सुरू फलटण तालुक्यातील निंबळक येथे घटना

फलटण : मामाच्या घरी सुटीसाठी आलेली अठरा वर्षीय युवती नीरा उजवा कालव्यात वाहून गेली. प्रियंका सुनील घोडके असे त्या युवतीचे नाव आहे. फलटण तालुक्यातील निंबळक या ठिकाणी शनिवारी सकाळी ही घटना घडली असून, वाहून गेलेल्या युवतीचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बारामती तालुक्यातील रुई या गावी राहणारी प्रियंका घोडके ही सुटीसाठी निंबळक येथे मामा विक्रम लालासो भोसले यांच्या घरी आली होती. शनिवारी सकाळी ती मामासोबत नीरा उजवा कालव्यावर गेली होती. मामा पोहत असताना प्रियंका कालव्याच्या काठावर बसली होती.

काही वेळांनंतर ती पाय धुण्यासाठी पाण्यात उतरली. यावेळी अचानक प्रियंकाचा तोल गेला आणि ती कालव्यात बुडाली. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ती कालव्यात वाहून गेली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांची घटनास्थळी गर्दी झाली. पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दुपारी उशिरापर्यंत कालव्यात शोधमोहीम सुरू होती. मात्र, प्रियंकाचा ठावठिकाणा लागला नाही.

Web Title: Satara: The niece of his uncle, who was born in the Narmada area, was carried away in the canal, the search started: the incident at Nimbalkar in Phaltan taluka.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.