सातारा : मिनी काश्मीरला आले बेटाचे स्वरूप, पर्यटकांची पावले तापोळ्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:38 PM2018-02-28T13:38:27+5:302018-02-28T13:38:27+5:30

मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा या पर्यटनस्थळाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोयना धरणाची पाणीपातळी खालावल्याने जलाशयातील अनेक उंचवटे पाण्याबाहेर आले असून, पाण्यातील ही बेटे पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत.

Satara: Mini Kashmir came in the form of the island, the steps of tourists on the pillow | सातारा : मिनी काश्मीरला आले बेटाचे स्वरूप, पर्यटकांची पावले तापोळ्याकडे

सातारा : मिनी काश्मीरला आले बेटाचे स्वरूप, पर्यटकांची पावले तापोळ्याकडे

googlenewsNext
ठळक मुद्दे मिनी काश्मीरला आले बेटाचे स्वरूपनिसर्गाचा अविष्कार पाहण्यासाठी पर्यटकांची पावले तापोळ्याकडे

सातारा : मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा या पर्यटनस्थळाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोयना धरणाची पाणीपातळी खालावल्याने जलाशयातील अनेक उंचवटे पाण्याबाहेर आले असून, पाण्यातील ही बेटे पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत.

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाचा परिसर हा जैवविविधतेने नटलेला आहे. प्राणी व वनसंपदेमुळे हा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या धरणाच्या बॅक वॉटरला वसलेलं तापोळा हे गाव पर्यटकांचं आवडतं पर्यटनस्थळ. मिनी काश्मीर म्हणून अशी ओळख प्राप्त झालेला तापोळ्याचा परिसर नौकाविहारासाठी प्रसिद्ध आहे.

महाबळेश्वर, पाचगणीला येणारे हजारो पर्यटक तापोळ्याला भेट देऊन पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटतात. सध्या कोयना धरणाची पाणीपातळी खालावू लागल्याने तापोळा व परिसरातील जलाशयाखाली असलेले अनेक उंचवटे पाण्याबाहेर येऊ लागल्याने यांना बेटांचे स्वरूप आले आहे. ही बेटे पर्यटकांना आकर्षित करू लागली आहे. नौकाविहार करताना अनेक पर्यटक निसर्गाचा हा अविष्कार कॅमेऱ्यांत कैद करीत आहेत.

Web Title: Satara: Mini Kashmir came in the form of the island, the steps of tourists on the pillow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.