सातारा : वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने औंध-पुसेसावळी वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:21 AM2018-05-28T11:21:44+5:302018-05-28T11:25:48+5:30

खटाव तालुक्याला रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यांने सोमवारी पहाटे चारच्या सुमारास औंध-पुसेसावळी रस्त्यावर वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

Satara: Aundh-Pussevali traffic jam after falling on the road | सातारा : वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने औंध-पुसेसावळी वाहतूक ठप्प

सातारा : वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने औंध-पुसेसावळी वाहतूक ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्दे वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने औंध-पुसेसावळी वाहतूक ठप्पखटाव तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

औंध (सातारा) : खटाव तालुक्याला रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यांने सोमवारी पहाटे चारच्या सुमारास औंध-पुसेसावळी रस्त्यावर वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.


औंध परिसरात आज पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह जोरदार वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. त्याच दरम्यान पाऊस ही सुरू झाला. या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात औंध-पुसेसावळी रस्त्यावर वडी येथे वडाचे झाड पडल्याचा मोठा आवाज झाला. झाड रस्त्याच्या मधोमध पडले. पहाटेची वेळ असल्याने वाहतूक नसल्याने कोणतीही हानी झाली नाही.


दरम्यान, सातारा-सांगली जाणाऱ्या रस्त्यावर वडी येथे वडीचे झाड उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाल्याने सकाळी औंधवरून पुसेसावळी व पुसेसावळीकडूून औंधकडे जाणारी वाहतूक थांबली आहे. काही वाहनांनी नवीन झालेल्या कळंबी-गणेशवाडी-औंध-रस्त्याचा वापर केला. पुसेसावळीतून औंधमार्गे सातारा जाणारी वाहतूक नागझरी, वाठार, रहिमतपूर अशी सुरू होती.

फांद्या कापण्यास सुरूवात

पडलेल्या वडाच्या झाडाला हटविण्यासाठी प्रशासनाची वाट न पाहता वडी ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास झाड हलविण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. मोठ्या फांद्या कुऱ्हाड व इतर अवजारांच्या मदतीने कमी करून एका बाजूने वाहनांना रस्ता उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 

Web Title: Satara: Aundh-Pussevali traffic jam after falling on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.