राजकारणाला धुंद पावसाळी संगीताची भुरळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:11 AM2017-08-19T00:11:06+5:302017-08-19T00:11:09+5:30

Politics is a fad of rainy music! | राजकारणाला धुंद पावसाळी संगीताची भुरळ !

राजकारणाला धुंद पावसाळी संगीताची भुरळ !

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
मायणी : एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गायनाने मराठी माणसाला भुरळ घातलेली असतानाच सातारा जिल्हा
परिषदेच्या माजी सदस्या शोभना गुदगे यांनी गायलेला ‘पाऊस अंतरी’ नावाचा एक आगळा-वेगळा म्युझिकल अल्बम रविवारी रसिकांच्या भेटीला येत आहे. राजकारणातही कला टिकविता येते, हे जगाला दाखवून दिले आहे.
मायणी येथील दिवंगत भाऊसाहेब गुदगे घराण्याच्या स्नुषा आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या पत्नी शोभना यांचा जन्म बेंगलोरमध्ये झाला असला तरी त्या दावणगिरी येथे लहानाच्या मोठ्या झाल्या.
कर्नाटकातील संगीताची परंपरा जोपासणारे शहर म्हणून दावणगिरीची वेगळी ओळख आहे.
त्यांच्या आई प्रमिला जयराज या शास्त्रीय संगीताच्या चाहत्या आहेत. त्यांच्यामुळे घरात संगीत अन् गायनाचं वातावरण होतं. शोभना या लहानपणापासूनच गाणं म्हणू लागल्या. चौथीत असताना त्यांच्यासाठी शिमोगा येथील पूर्वाचार्य यांना संगीत शिक्षक म्हणून पाचारण करण्यात आले. घरातच संगीताचे शिक्षण सुरू झाले.
जिल्हा व राज्य पातळीवरील अनेक परीक्षा देत गेल्या. ‘आॅल इंडिया बेंगलोर’वरही गायनाचे
सादरीकरण झाले. त्यामुळे कर्नाटकच्या संगीत क्षेत्रात त्यांचे नाव झाले. सुरेंद्र गुदगे यांच्याशी १९९६ मध्ये लग्न झाल्यानंतर त्या संगीताऐवजी राजकारणात आल्या. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या.
लहानपणापासून कन्नड भाषेत बोलणाºया शोभना यांनी लग्नानंतर प्रथमच मराठी भाषा ऐकली. या भाषेच्या व्याकरणामुळे
गोंधळ उडायचा; पण अल्पावधीतच त्यांनी ही भाषा आत्मसात करून आता स्वत:च्या आवाजातील मराठी म्युझिकल अल्बम सादर केला
आहे.
भाषा संगीताला अडसर ठरत नाही, हेच या अल्बममधून पुन्हा एकदा सिद्ध होते. त्या आजही मराठी बोलताना अमराठी भाषिक असल्याचे जाणवते; परंतु त्यांचं मराठी गाणं ऐकताना तसे होत नाही.
सोबतीला स्वप्नील बांदोडकरांचा आवाज
‘टाईमपास १ अन् २’ मराठी चित्रपटाला संगीत देणारे संगीतकार चिनार-महेश यांनी गुदगे यांच्या अल्बमला संगीत दिले आहे. त्यांच्यासोबत प्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांचाही आवाज आहे. ‘पाऊस येताना अनेक रंग घेऊन येतो. मनास मंत्रमुग्ध करतो. तो आपल्या अंर्तमनात प्रेमाचे उधाण आणतो,’ अशा थीमवर आधारित हे गाणे आहे. लवकरच शूरवीर सैनिक व त्यांच्या शूर पत्नी यांच्यावर आधारित दुसरे गाणे अवधूत गुप्ते यांच्यासोबत येत आहे.
या व्हिडीओ अल्बममधील दृष्ये क्लासमेट, बसस्टॉप या चित्रपटातील सुप्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि आॅनलाईन-बिनलाईन फेम ॠतुजा शिंदे यांच्यावर चित्रीत झाली आहेत.
माझे सासरे दिवंगत भाऊसाहेब गुदगे हे माझे गायनही ऐकत असत. त्यासाठी आग्रही असत. संगीत हे माझ्या जीवनाचे एक अंग बनले होते. त्यामुळेच पती सुरेंद्र गुदगे यांनी मला गायिका म्हणून प्रेझेंट करायचे ठरविले. अन् माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न सत्यात उतरले. मराठीतील माझे पहिले गाणे ‘पाऊस अंतरी’ रविवार, दि. २० आॅगस्टला रिलीज होत असून, ते मी भाऊसाहेब यांना समर्पित करीत आहे.
- शोभना गुदगे, माजी जिल्हा परिषद सदस्या

Web Title: Politics is a fad of rainy music!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.