फलटण : ‘न्यू फलटण शुगर’च्या चेअरमनसह तिघांवर गुन्हा : कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:52 AM2018-09-21T00:52:40+5:302018-09-21T00:57:54+5:30

फेब्रुवारी २०१८ ते आजअखेर न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडी कारखान्याने ऊस उत्पादक शेतकºयांचे अंदाजे ५१ कोटी रुपये न दिल्याप्रकरणी कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांच्या

Phaltan: Three fines with the Chairman of New Phaltan Sugar: The demand for action | फलटण : ‘न्यू फलटण शुगर’च्या चेअरमनसह तिघांवर गुन्हा : कारवाईची मागणी

फलटण : ‘न्यू फलटण शुगर’च्या चेअरमनसह तिघांवर गुन्हा : कारवाईची मागणी

Next
ठळक मुद्दे शेतकऱ्यांची ५१ कोटींच्या फसवणुकीचा ठपका शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकºयांच्या उसाचे पैसे मिळण्याबाबत आंदोलन केले

फलटण : फेब्रुवारी २०१८ ते आजअखेर न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडी कारखान्याने ऊस उत्पादक शेतकºयांचे अंदाजे ५१ कोटी रुपये न दिल्याप्रकरणी कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांच्या विरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत नारायण साहेबराव अभंग (वय ६५, रा विडणी, ता. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, फेब्रुवारी २०१८ पासून फलटण तालुक्यातील शेतकºयांनी साखरवाडी, ता. फलटण येथील न्यू फलटण शुगर वर्क्सला ऊस दिलेला होता. त्यानंतर १४ दिवसांनी कारखान्याने खात्यावर पैसे जमा करणे आवश्यक होते. परंतु त्यांनी खात्यावर पैसे जमा केले नाहीत.

वेळोवेळी कारखान्याचे चेअरमन प्रल्हाद साळुंखे-पाटील, व्हाईस चेअरमन धनंजय साळुंखे-पाटील व संचालक शामराव मारुती भोसले यांना खात्यावर पैसे जमा करण्यासाठी विनंती केली होती. तरीही त्यांनी खात्यावर पैसे जमा केले नाहीत. शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकºयांच्या उसाचे पैसे मिळण्याबाबत आंदोलन केले. यावेळी चेअरमन आणि संचालक मंडळाने ५ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करू, असे लेखी पत्र दिले होते. तरीही पैसे जमा झाले नाहीत.

यानंतर १४ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांचे उसाचे पैसे खात्यावर जमा करतो, असे प्रातांधिकारी यांच्यासमोर चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांनी लेखी दिले. परंतु ऊस कारखान्याला देऊन सात महिने झाले तरीही चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांनी समक्ष व फोनवरून वेळोवेळी बैठक घेऊन तुमचे पैसे आज जमा करतो, उद्या जमा करतो, असे म्हणूनही आश्वासन देऊनही एक पैसाही खात्यावर जमा केला नाही.

२८ टन उसाचे ७४ हजारांचे तर इतर ऊस उत्पादक शेतकºयांची अंदाजे ५१ कोटींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कारखान्याचे चेअरमन प्रल्हाद साळुंखे-पाटील, व्हाईस चेअरमन धनंजय साळुंखे-पाटील, संचालक शामराव मारुती भोसले यांच्या विरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हंकारे हे करीत आहेत.

प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन..
एकीकडे शेतकºयांचे ऊस गाळपाचे पैसे न दिल्याबाबत गुन्हे दाखल झाले असताना दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकºयांच्या थकीत ऊस बिलासाठी व कर्मचाºयांच्या थकीत पगाराबाबत प्रांत कार्यालयाच्या बाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, सचिन खानविलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, प्रल्हादराव भोईटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.

Web Title: Phaltan: Three fines with the Chairman of New Phaltan Sugar: The demand for action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.