मनोरुग्णही बनले आंदोलनकर्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 10:52 PM2018-07-04T22:52:55+5:302018-07-04T22:52:59+5:30

Movement activists who became psychoactive | मनोरुग्णही बनले आंदोलनकर्ते

मनोरुग्णही बनले आंदोलनकर्ते

Next


सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत होते. या मनोरुग्णांनी बुधवारी हातात फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवरच ठिय्या मारला. या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.
श्रीकांत भोई यांनी दोन मानसोपचार तज्ज्ञांची रुग्णालयात नियुक्ती केली.
यशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रवी बोडके यांच्या नेतृत्वाखाली मनोरुग्णांनी हे आंदोलन केले. जिल्हा रुग्णालयात रोज जिल्हाभरातील सुमारे १०० ते १५० लोक मानसिक उपचारासाठी तसेच
अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी येत असतात. तसेच प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा, पुणे या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील मनोविकार तज्ज्ञांचे प्रमाणपत्र आवश्यक असते, त्यानंतरच जिल्हा न्यायाधीश उपचारासाठी परवानगी देतात; परंतु जिल्हा रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ नसल्याने अनेक मानसिक आजारी रुग्णांचे हाल होत होते.
अनेकदा प्रशासनाला निवेदन सादर करूनही कोणतीच उपाययोजना होत नव्हती. मनोरुग्णांच्यावर नियमित औषधोपचार होत नसल्याने त्यांचा छळ होत होता. अनेकदा फिट येण्यासारखे प्रकार तसेच आत्महत्येचा विचार औषधोपचाराअभावी रुग्णांच्या मनात येत होते.
जोपर्यंत मनोविकार तज्ज्ञांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार
नाही, तसेच आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली.
या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी तत्काळ फोनाफोनी करून उपाययोजना केली.
जिल्हा शल्यचिकित्सकांचे लेखी पत्र
आंदोलक आंदोलन मागे घ्यायला तयार नव्हते. अखेर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी डॉ. अभिजित घोरपडे व डॉ. नितीन रोकडे या दोन मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती केल्याचे पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. हे दोघेही तज्ज्ञ एकाड-एक दिवस जिल्हा रुग्णालयात सेवा बजावणार आहेत.
नेमकी काय होती समस्या?
सातारा जिल्ह्यामध्ये तब्बल साडेतीन हजार मनोरुग्ण आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयातील मनोविकार तज्ज्ञांनी राजीनामा दिल्याने मनोरुग्णांचे हाल होत होते.

Web Title: Movement activists who became psychoactive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.