ग्रामसभेत जिल्हाधिकाऱ्यांचा ‘मोबाईल स्पीकर आॅन’ आदेश

By admin | Published: July 21, 2016 11:05 PM2016-07-21T23:05:45+5:302016-07-21T23:32:19+5:30

फरांदवाडी : जनावरांच्या मृत्यूप्रकरणी थेट जिल्हाधिकाऱ्यांश्ी संवाद

'Mobile Speaker-order' order of District Officials in Gram Sabha | ग्रामसभेत जिल्हाधिकाऱ्यांचा ‘मोबाईल स्पीकर आॅन’ आदेश

ग्रामसभेत जिल्हाधिकाऱ्यांचा ‘मोबाईल स्पीकर आॅन’ आदेश

Next

वाठार निंबाळकर : अज्ञात रोगाने अकस्मात मरण पावणाऱ्या जनावरांच्या घटनेचा तत्काळ पंचनामा करावा, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी थेट मोबाईलवरून फरांदवाडीच्या ग्रामसभेत गटविकास अधिकाऱ्यांना दिला. या ग्रामसभेत गामस्थांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला होता. त्यानंतर मोबाईलचा स्पीकर आॅन करून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना दिलेला आदेश ग्रामसभेत ऐकवला गेला.
‘आमचा गाव आमचा विकास’ या आराखड्याअंतर्गत फरांदवाडी, ता. फलटण गावात तीन दिवसीय कार्यक्रमात दोन कोटी तीस लाख सोळा हजार रुपयांचा विकास आराखडा करण्याच्या कामांची गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव यांच्याकडून प्रशंसा करण्यात आली आहे.
तीन दिवसीय या कार्यक्रमांमध्ये मशाल फेरी, प्रभात फेरी, शिवार फेरी व सांगता कार्यक्रमावेळी गटविकास अधिकारी विजयसिंंह जाधव यांच्या उपस्थितीत ग्रामसभा झाली. यावेळी विस्तार अधिकारी सी. एस. शिंदे, प्रशिक्षक आर. टी. ढेकळे, ग्रामसेवक गणेश दडस, सरपंच सविता नाळे, उपसरपंच दीपाली कोरपडे, कांताकाका भोसले उपस्थिती होती.
गावात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जमिनीमधील काही जागा गावाला मिळण्याचा ठराव केला. त्याला गटविकास अधिकारी यांनी जागा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
ग्रामसभेला सदस्या सोनाली बोराटे, बेबीताई टिळेकर, पूजा फरांदे, राजेंद्र नाळे, प्रभाकर कर्णे, राकेश शिंदे, मोहन नाळे, विठ्ठल हिंगणे, राजेंद्र राऊत, विकास फरांदे व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)


या कामांना संमती..!
ग्रामसभेमध्ये शिक्षण विभागाचा २३ लाख रुपये, अंगणवाडी विभाग ८ लाख रुपये, रस्ते विभाग ८९ लाख पन्नास हजार रुपये, पाणीपुरवठा विभाग ५० लाख रुपये, रोडलाईट ३ लाख १० हजार रुपये, आरोग्य विभाग ३ लाख २१ हजार, कृषी विभाग ३० लाख रुपये व इतर कामे २९ लाख ५० हजार रुपयांचा आराखडा सर्व संमतीने ग्रामसभेमधून तयार करण्यात आला.

Web Title: 'Mobile Speaker-order' order of District Officials in Gram Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.